महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्रबोधनकार ठाकरे सभागृहात लसीकरण केंद्राचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन - कोरोनाचा बचावासाठी लसीकरण

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विविध ठिकाणी लसीकरण केंद्राचे महानगरपालिकेकडून उद्घाटन केले जात आहे. त्याचप्रमाणे बोरिवली प्रबोधनकार ठाकरे सभागृहामध्ये लसीकरण केंद्राचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

लसीकरण केंद्राचे महानगरपालिकेकडून उद्घाटन
लसीकरण केंद्राचे महानगरपालिकेकडून उद्घाटन

By

Published : May 26, 2021, 7:13 PM IST

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विविध ठिकाणी लसीकरण केंद्राचे महानगरपालिकेकडून उद्घाटन केले जात आहे. त्याचप्रमाणे बोरिवली येथे प्रबोधनकार ठाकरे सभागृहामध्ये लसीकरण केंद्राचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र हा प्रभाग भाजपाचा असल्यामुळे या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा देखील या ठिकाणी उडालेला पाहायला मिळाला.

प्रबोधनकार ठाकरे सभागृहात लसीकरण केंद्राचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

ग्लोबल टेंडर
महानगरपालिकेच्या वतीने ग्लोबल टेंडर काढण्यात आले होते. या ग्लोबल टेंडरसाठी पहिल्यांदा प्रतिसाद न मिळाल्यामुळे टेंडरची मुदत वाढविण्यात आली होती. मात्र दुसऱ्यांदा देखील या ग्लोबल टेंडरची मुदत वाढवलेल्या टेंडरमध्ये ज्या आठ कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये काही त्रुटी दिसून येत आल्या. त्यासाठी ही मुदत वाढवली आहे. त्यामुळे या सर्व कंपन्यांना महानगरपालिकेच्या वतीने पेपर जमा करण्यासाठी सांगितले आहे.

गरोदर महिला
केंद्र, राज्य व महानगरपालिका अशा प्रकारे नेहमी कार्यक्रमाचा क्रम असतो. परंतु येणारी तिसरी लाट पाहता कोणत्याही गरोदर महिला व त्याच्या बाळाला त्रास होऊ नये, यांची दक्षता घेऊन या सर्व नागरिकांना लसीकरण केंद्रावर थेट लस देण्यात येणार आहे.

हेही वाचा -राहायला जागा नसल्याने महिला रिक्षा टेम्पोमध्येच क्वारंटाईन; गंगापूरमधील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details