President at Raj Bhavan : राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनातील दरबार हॉलचे उद्घाटन - New Darbar Hall Raj Bhavan Mumbai
राष्ट्रपती रामनाथ कोविंद चार दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. आज राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनातील नव्या दरबार हॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती आहे.
President at Raj Bhavan
मुंबई- राष्ट्रपती रामनाथ कोविंद सपत्नीक चार दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. आज राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनातील नव्या दरबार हॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिपादन केले. त्यांनी पुढील महत्वाचे मुद्दे मांडले.
- दरबार हॉलचे अप्रतिम असं सौंदर्य नव्या दमाने लोकांसमोर ठेवले
- मुंबई तील राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन आहे
- एका बाजूला अथांग समुद्र दुसऱ्या बाजूला सुंदर झाडं, ज्याला शहरातील जंगल असं देखील म्हणता येईल. याने हे राजभवन अधिकच सुंदर झाले आहे.
- इथली हवा थंड आहे, राजकीय हवा कशीही असू द्या, इथली हवा थंड आहे.
- पावसाळ्यात थुई थुई नाचणारे मोर आहेत. इथून सर्पमित्राकडून विषारी सर्प पकडल्याचे फोटो आपण पाहतो.
- अशी वास्तू शोधून सापडणार नाही
- ब्रिटीश गव्हर्नरचे हे चौथे निवासस्थान होते.
- ग्यानी झैलसिंग यांनी शिवसेनाप्रमुखांना बोलावलं होतं, प्रणवदा होते त्यांनी मला भेटायला बोलावले होते. अशा अनेक आठवणी आहेत.
Last Updated : Feb 11, 2022, 12:17 PM IST