मुंबई - बिकेसी येथील एमएमआरडीएच्या मैदानात हुनर हाट भरवण्यात आले आहे. ३१ राज्यातील 4000 पेक्षा अधिक कारागीर एकत्र आले असून आपल्या विविध राज्यातील हँडक्राफ्ट वस्तू, खाद्यसंस्कृतीचा दर्शन हाट प्रदर्शनात होत आहे. मुंबईकरांनी येथे येऊन खाद्यसंस्कृतीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच अशा कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. तसेच जगभरातील बाजार पेठेत भारताने तयार केलेल्या वस्तू पोचत असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. १७ तारखेपासून ते २७ तारखेपर्यंत हे हुनर हाट सुरू राहील. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे हे ४० वे हुनर हाट आहे. केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
Hunar Haat Mumbai : मुंबईत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'हुनर हाट'चे उद्घाटन - बिकेसी येथील एमएमआरडीए मैदान हुनर हाट
खाद्यसंस्कृतीचा दर्शन हाट प्रदर्शनात होत आहे. मुंबईकरांनी येथे येऊन खाद्यसंस्कृतीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच अशा कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. तसेच जगभरातील बाजार पेठेत भारताने तयार केलेल्या वस्तू पोचत असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
उद्घाटन प्रसंगी मान्यवर
Last Updated : Apr 17, 2022, 7:33 PM IST