महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चैत्यभूमीतील 'अखंड भीमज्योती' चे रामदास आठवलेंच्या उपस्थितीत लोकार्पण - akhand bhimjyoti

केंद्रीय सामाजिक व न्याय  मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमूख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला .

अखंड भीमज्योती

By

Published : Sep 11, 2019, 11:22 AM IST

Updated : Sep 11, 2019, 3:42 PM IST

मुंबई -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा देणाऱ्या 'अखंड भीमज्योती' चे आज (बुधवार) चैत्यभूमी येथे लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमूख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले

हेही वाचा - चंपारणचे 'ते' आंदोलन, ज्यामुळे गांधी झाले 'महात्मा'...

यावेळी रामदास आठवले म्हणाले, ही भीमज्योत अशीच तेवत राहून विषमतेचा अंधार दूर होणार आहे. चैत्यभूमी सर्व आंबेडकरवादी नागरिकांचे प्रेरणास्थान आहे. चैत्यभूमीची भिंत वाढवून घेणार असून चैत्यभूमीवर भव्य स्तूप उभारला जाईल, असे आश्वासनही केंद्रीय मंत्री आठवले यांनी यावेळी दिले.

हेही वाचा - चैत्यभूमीसमोर भीमज्योत उभारणे हा सरकारचा राजकीय डाव - आनंदराज आंबेडकर

या लोकार्पण कार्यक्रमाला, सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे, राज्यमंत्री अविनाश महातेकर, स्थानिक खासदार राहुल शेवाळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. भीमज्योत उभारण्यावरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Last Updated : Sep 11, 2019, 3:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details