महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vikroli Murder case : लहान भावाने केली मोठ्या भावाची धारदार शस्त्राने हत्या - विक्रोळी पोलीस

विक्रोळीमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून ( Vikhroli property dispute ) झालेल्या भाडंणात एकाची हत्या झाली आहे. यामध्ये लहान भावानेच मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक ( Vikhroli police arrested to the accused ) केली आहे.

विक्रोळी
Vikhroli

By

Published : Dec 30, 2021, 4:48 PM IST

मुंबई :विक्रोळीमध्ये भावानेच भावावर ( Brother's attack on brother in Vikhroli ) धारधार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हा प्रॉपर्टीच्या भांडणातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात विजय साळवी (56) गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. हल्ला केलेल्या भावाचे नाव उत्तम साळवी (55) आहे. त्याला विक्रोळी पोलिसांनी अटक केली आहे.

मागील बऱ्याच दिवसापासून विक्रोळी येथे साळवी भावंड राहत ( Salvi siblings lived in Vikhroli ) होती. साळवी भावंडात विजय हा मोठा होता, तर उत्तम हा मोठा होता. मात्र, प्रॉपर्टीच्या वादातून त्यांच्यात सतत भडका उडत होता. आज सकाळी या दोघांमध्ये यावरुन कडाक्याचे भांडण झाले. त्या भांडणाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. यामध्ये उत्तम साळवी याने विजय साळवी यांच्या वरती धारदार शस्त्राने हल्ला केला. ज्यामध्ये विजय हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयामध्ये उपाचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले.

त्यानंतर विक्रोळी पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली आणि काही तासातच पोलिसांनी हल्ला करणाऱ्या उत्तम साळवीला अटक ( Uttam Salvi arrested ) केली आहे. आता पुढील तपास चालू असल्याचे विक्रोळी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. विजय साळवी हे बेस्ट ( Vijay Salvi Best Bus Worker ) मध्ये कामाला होते. त्याचबरोबर प्रभागांमध्ये समाजसेवक म्हणून परिचित होते.

हेही वाचा -Omicron In Mumbai - मुंबईत ओमायक्रॉनचे ३३ नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा पोहोचला ११८ वर

ABOUT THE AUTHOR

...view details