मुंबई- कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेमध्ये पुन्हा एकदा देशाची राजधानी मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनला एक महिना पूर्ण झालेला असून, एप्रिल 2021 या महिन्यांमध्ये मुंबई शहरात दुप्पट गुन्हे वाढल्याचे समोर आले आहे.
मुंबईत घडलेले वेगवेगळे गुन्हे
मुंबई शहरात एप्रिल 2021 या महिन्यामध्ये 9037 गुन्ह्यांची नोंद झालेली असून, या दरम्यान मुंबई शहरातील 94 पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. एप्रिल 2021 या महिन्यांमध्ये मुंबई शहरात तब्बल 7 खुनाचे गुन्हे घडले असून खुनाच्या प्रयत्नाचे 27 गुन्हे घडलेले आहेत. दरोड्याचा 1 गुन्हा मुंबई पोलिसांकडून नोंदविण्यात आलेला असून रॉबरी चे 44 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. खंडणीचे तब्बल 12 गुन्हे नोंदविण्यात आले असून घरफोडीचे 95 गुन्हे मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आलेले आहेत. चोरीचे तब्बल 258 गुन्हे घडले असून, वाहन चोरीचे 198 गुन्हे आतापर्यंत नोंदविण्यात आलेले आहेत. जखमी करण्याचे 321 गुन्हे , दंगलीचे 27, बलात्काराचे 66 विनयभंगाचे 138 गुन्हे व इतर आयपीसी प्रकरणातील 7843 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.