मुंबई - गेल्या काही वर्षात मुंबईत मुसळधार पाऊस पडून पूरस्थिती, दरडी, इमारत कोसळणे आदी आपत्कालीन घटना ( Flood emergencies in flood ) घडतात. अशा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महापालिकेची यंत्रणा ( BMC preparation for rain season ) सज्ज झाली आहे. एनडीआरएफसह यावेळी लष्कराच्या तुकड्याही तैनात ठेवण्यात येणार आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास रहिवाशांना तत्काळ स्थलांतरीत करण्यासाठी एनडीआरएफसह ( NDRF team deployed in Mumbai ) आता लष्कराचाही वापर केला जाणार आहे.
एनडीआरएफसह लष्कराच्या तुकड्या सज्ज- मुंबईत मुसळधार पावसांत अनेक ठिकाणी पाणी तुंबून पूरस्थिती ( Mumbai monsoon situation ) निर्माण होते. मुंबईत सखल भागात पाणी साचून अनेक घरांत पाणी भरण्याच्या घटना घडतात. याशिवाय दरडी, जुन्या धोकादायक इमारती कोसळणे तसेच पाणी तुंबून वसाहतीत पाणी शिरत असल्याने आपत्कालीन स्थिती निर्माण होते. रस्ते, रेल्वे परिसर तसेच वसाहतींचा भाग जलमय झाल्यास मुंबई ठप्प होते. अनेकजण धोक्याच्या स्थितीत अडकून पडतात. सखल भागात पाण्याचा निचरा होत नसल्याने तलावाचे स्वरुप निर्माण होते. यासाठी पालिका आपली यंत्रणा सज्ज ठेवते. अग्निशमन दल, जीव रक्षक तसेच एनडीआरएफच्या ( Firefighters lifeguards and NDRF units ) तुकड्याही तैनात असतात.