मुंबई -एकीकडे महाविकास आघाडी सरकार अखेरच्या घटका मोजत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या गोटात सत्ता स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( ShivSena rebel leader Eknath Shinde ) यांनी पुकारलेल्या बंडाचा आजचा पाचवा दिवस आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी आजही फडणवीस यांच्या भेटीसाठी नेत्यांची रिघ लागली आहे. भाजपा आमदार, खासदार, नेते भेटीस तर येतच आहेत. याशिवाय अपक्ष आमदारही देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या शासकीय बंगल्यावर दाखल होत आहेत.
आमदार रवी राणाही आले - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, आशिष शेलार, गिरीश महाजन, मंगल प्रभात लोढा अतुल भातखळकर हे सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत. याशिवाय अपक्ष आमदार रवी राणा देखील फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत.