महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सगळ्या मंदिरात CCTV, पण मशिदीत CCTV आहेत का, बाळा नांदगावर यांचा सवाल - MNS on Loudspeaker

मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा चर्चेत आलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना सध्या महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत ( MNS on Loudspeaker ) नाही. कारण, भोंग्यांच्या मुद्द्यावरून सरकार सर्व धर्माच्या धर्मगुरूंशी व सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून नियमावली तयार करण्याच्या मार्गावर असताना, आता मनसेने आणखी एक नवा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.

बाळा नांदगावकर
बाळा नांदगावकर

By

Published : Apr 20, 2022, 6:52 PM IST

मुंबई- मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा चर्चेत आलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना सध्या महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत ( MNS on Loudspeaker ) नाही. कारण, भोंग्यांच्या मुद्द्यावरून सरकार सर्व धर्माच्या धर्मगुरूंशी व सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून नियमावली तयार करण्याच्या मार्गावर असताना, आता मनसेने आणखी एक नवा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.

ट्वीट

काय आहे मनसेची नवी मागणी..? -मशिदींवरील भोंग्यानंतर आता मनसेने सीसीटीव्हीचा नवा मुद्दा उपस्थित केला आहे. सर्व मंदिरांमध्ये सध्या सीसीटीव्ही आहेत मात्र मशिदींमध्ये नाहीत, असे का ?, असा सवाल मनसेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर ( MNS Leader Bala Nandgaonkar ) यांनी केला आहे. यावेळी त्यांनी मशिदींसह सर्व धार्मिक स्थळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात यावेत, अशी मागणी ट्विटद्वारे केली आहे.

हेही वाचा -Loudspeaker Controversy : भोंगा राजकारणात रस नाय, आम्ही भले अन् आमचा व्यवसाय भला; भोंगे व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया

काय आहेत ट्विट ? -बाळा नांदगावकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "जवळपास सगळ्या मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. पण, मशिदीत सीसीटीव्ही आहेत का ?, सर्वधर्मीय प्रार्थनास्थळात सीसीटीव्ही यंत्रणा का करू नये ?, हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी", असे ट्वीट करण्यात आले आहे.

दरम्यान, आता मनसेच्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून ॲक्शन मोडमध्ये आलेले सरकार हा नवा सीसीटीव्हीच्या मुद्दा कसा हाताळत ? यासाठीही एखादी नियमावली बनवली जाणार का ? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा -Loudspeaker Sales Hike in Mumbai : राजकीय भोंग्यात मुंबईतील भोंगे विक्रेत्यांना 'अच्छे दिन'; विक्री वाढली

ABOUT THE AUTHOR

...view details