महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हिंदूत्वाच्या इतिहासात उद्धव ठाकरेंचे नाव डांबराने लिहले जाईल -अतुल भातखळकर - etv bharat live

गणेश वित्सर्जनाला बंदी सोसायटीमध्ये गर्बा खेळायला बंदी, दहीहंडीला बंदी. मात्र, ईदच्या मिरवणूकीला परवानगी दिली आहे. व्वा ठाकरे सरकार. हे यांचे हिंदूत्व असे म्हणत हिंदूत्वाच्या इतिहासात उद्धव ठाकरे तुमचे नाव डांबराने लिहले जाईल अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. दरम्यान, त्यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून साडेआठ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थांना वेठीस धरण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर  यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
भाजप आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

By

Published : Oct 20, 2021, 11:15 AM IST

मुंबई - गणेश वित्सर्जनाला परवानगी नाकारली, सोसायटीमध्ये गर्बा खेळायला बंदी, दहीहंडीला बंदी. मात्र, ईदच्या मिरवणूकीला परवानगी दिली आहे. व्वा ठाकरे सरकार. हे यांचे हिंदूत्व असे म्हणत हिंदूत्वाच्या इतिहासात उद्धव ठाकरे तुमचे नाव डांबराने लिहले जाईल अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. दरम्यान, त्यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून साडेआठ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थांना वेठीस धरण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर

'लोहमार्ग पोलीस भरती प्रक्रियेतील कॉपी-कांड'

आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील गोंधळ सुरु असतानाच आता लोहमार्ग पोलीस भरती प्रक्रियेतील कॉपी-कांडसुद्धा उघडकीस आले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून राबवण्यात येणारी भरती परीक्षा नसून विद्यार्थ्यांना 'शिक्षा' असल्याची टीका करत, मुख्यमंत्री महोदय राज्यातील युवकांना वेठीस धरणे कधी थांबवणार? असा प्रश्न भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

'शिक्षकच गुगलच्या मदतीने उत्तर शोधून ठराविक विद्यार्थ्यांना सांगत होते'

राज्याच्या आरोग्य विभागाच्या भरतीचा गोंधळ अद्यापही मिटलेला नाही. दुसऱ्यांदा परीक्षा घेताना देखील या तरुणांना मनस्तापच सहन करायला लागत असल्याचे दिसत आहे. अनेक परीक्षार्थींना अर्ज करताना जे केंद्र मागितले ते मिळालेच नाही. तर याहीवेळी अनेक परिक्षार्थीचे प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळसुद्धा नाही. त्यामुळे नक्की परीक्षा कशी द्यायची असे प्रश्न परीक्षार्थींमध्ये पुन्हा एकदा निर्माण झाले आहेत. अशीच अवस्था १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या लोहमार्ग पोलीस भरती प्रक्रियेची सुद्धा आहे. वर्गातील पर्यवेक्षकच गुगलच्या मदतीने उत्तर शोधून ठराविक परीक्षार्थींना ते सांगत होते. तर, काही ठिकाणी परीक्षार्थींना चर्चा करून परीक्षा देण्याचा प्रकार करण्यात आला. काही परीक्षा केंद्रावर हुशार परीक्षार्थींचे पेपर पाहून इतर परीक्षार्थींचे पेपर सोडवण्यात आल्याचे समोर आले आहे. असही भातखळकर यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा -आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details