मुंबई- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख मनी लॉड्रिंग प्रकरणांमध्ये सीबीआयने अॅड. जयश्री पाटील यांचा जवाब नोंदवण्यासाठी आज बोलावले होते. त्याअनुषंगाने अॅ. जयश्री पाटील आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते हे दोघेही मरीन लाईन येथील मिस्ट्री कोर्ट बिल्डिंगमध्ये पोहोचले होते. तेथील सीबीआय गेस्ट हाऊसमध्ये सीबीआय अधिकारी यांच्याकडून जयश्री पाटील यांचा तब्बल 3 तास पेक्षा अधिक काळ जबाब नोंदविण्यात आला आहे.
जयश्री पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयला तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने आज सीबीआयकडून जबाब नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात सीबीआयने अनिल देशमुख यांचा आर्थर रोड जेलमध्ये जाऊन जबाब नोंदवला होता. तसेच या प्रकरणातील संबंधित आरोपींचा देखील सीबीआयने जवाब नोंदविला आहे. आपल्या जवाबात अॅड. जयश्री पाटील यांनी काय माहिती दिली त्याबाबत त्यांनी जास्त काही बोलण्यास नकार दिला. पण भ्रष्टाचार प्रकरणात आम्ही लढा देत आहोत. त्याचसंदर्भात आज आम्ही आपला जवाब नोंदविला आहे, असे त्यांनी शेवटी सांगितले.