महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मंत्रालयातील 2 पोलिसांसह एक लिपिक ओमायक्रॉनग्रस्त; बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू - clerk found omicron positive kalyan

आता पुन्हा ओमायक्रॉनची लागण झालेले 3 रुग्ण कल्याण डोंबिवलीत सापडले असून, हे तिन्ही रुग्ण मंत्रालयातील कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Dec 30, 2021, 9:54 PM IST

ठाणे - महाराष्ट्रातील पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण कल्याण येथे सापडला होता. हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून आला होता. तर, नायजेरियातून आलेल्या दुसऱ्या रुग्णाला देखील ओमायक्रॉन झाल्याचे निदान झाले होते. मात्र, या दोन्ही रुग्णांनी त्यावर यशस्वी मात केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, आता पुन्हा ओमायक्रॉनची लागण झालेले 3 रुग्ण कल्याण डोंबिवलीत सापडले असून, हे तिन्ही रुग्ण मंत्रालयातील कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा -Dispute in Shivsena and NCP Corporators : राज्यात सत्तेत एकत्र असलेले ठाण्यात शिवसेना अन् राष्ट्रवादीचे नगरसेवक भिडले

तिन्ही रुग्ण केडीएमसीच्या आर्ट गॅलरी रुग्णालयात दाखल

मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रत्येक आठवड्याला टेस्टिंग केली जाते. मागील आठवड्यात मंत्रालयात करण्यात आलेल्या टेस्टिंगमध्ये एक पोलीस कर्मचारी कोरोना पोझिटिव्ह आल्याने त्याच्या स्वॅबचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. पॉझिटीव्ह आल्यानंतर हा कर्मचारी घरातच विलगीकरणात राहत होता. त्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचा अहवाल मिळताच त्याला कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या विलगीकरणात दाखल करण्यात आले. ही घटना ताजी असतानाच बुधवारी आणखी दोघांचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील एक मंत्रालयातील पोलीस कर्मचारी असून, दुसरा लिपिक आहे. तिघांना केडीएमसीच्या आर्ट गॅलरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर त्यांच्या कुटुंबीयाची टेस्टिंग करण्यात आली असून, त्यांचे अहवाल प्रलंबित असल्याचे वैद्यकीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

हेही वाचा -Thane-Diva: खूशखबर ; मार्च 2022 पर्यंत ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर धावणार 80 लोकल ट्रेनच्या फेऱ्या

ABOUT THE AUTHOR

...view details