महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत शहर आणि उपनगरात जोरदार पावसाची शक्यता, थंड वारे वाहणार - मुंबई पाऊस बातमी

गेल्या पाच ते सहा दिवसापासून मुसळधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचले होते. तसेच लोकल, रस्ते वाहतूकीवरही याचा परिणाम झाला होता. येत्या चार ते पाच दिवसात मुंबईत शहर आणि उपनगरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यात 45 ते 55 एवढ्या वेगाने किलोमीटरपर्यंत थंड वारे वाहणार आहे.

थंड वारे वाहणार
थंड वारे वाहणार

By

Published : Jul 21, 2021, 9:54 AM IST

मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस तसेच थंड वारे वाहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याचबरोबर काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गेल्या पाच ते सहा दिवसापासून मुसळधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचले होते. तसेच लोकल, रस्ते वाहतूकीवरही याचा परिणाम झाला होता. येत्या चार ते पाच दिवसात मुंबईत शहर आणि उपनगरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यात 45 ते 55 एवढ्या वेगाने किलोमीटरपर्यंत थंड वारे वाहणार आहे. तसेच काही ठिकाणी 60 किलोमीटर वेगाने थंड वारे वाहू शकतात, असे हवामान खात्याकडून दिल्याची मुंबई महापालिकेने माहिती दिली आहे.

10 मिमी पावसाची नोंद
मंगळवारी सकाळी 8 ते बुधवारी सकाळी 8 वाजे पर्यंत 24 तासात शहर विभागात 11.69, पश्चिम उपनगरात 13.24, तसेच पूर्व उपनगरात 17.95 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सकाळी 9.52 वाजता 4.12 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात, असेही हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी गरज नसल्यास बाहेर पडू नये, तसेच सतर्क रहावे असेही मुंबई महापालिकेने आवाहन केले आहे.

हेही वाचा -'सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई मॉडेल स्वीकारणार का?'

ABOUT THE AUTHOR

...view details