महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Four storey slabs of a building collapsed : नेरुळमध्ये इमारतीच्या चार मजल्यांचे स्लॅब एकापाठोपाठ कोसळल्याने एकाचा मृत्यू, बचावकार्य सुरू - इमारत कोसळली

नवी मुंबईमधील ( Navi Mumbai ) नेरुळ ( Nerul ) परिसरातील सेक्टर 19 मधील जिमी पार्क इमारतीच्या आतील चार स्लॅब एकापाठोपाठ कोसळल्याची ( Four Slabs collapsed ) घटना घडली आहे. या इमारतीच्या आत असलेल्या 7 जखमींना बाहेर काढण्यात आहे. अद्यापही एक महिला स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकली आहे. ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत समाविष्ट होती. या घटनेने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारती खाली करण्याच्या सूचना मुंबई पालिकेने नागरिकांना दिल्या आहेत. मात्र, तरीही नागरिक घरे सोडत नाहीत आणि त्यांना दुर्घटनांना सामोरे जावे लागत असल्याच्या घटना घडत आहेत.

five Slabs collapsed
five Slabs collapsed

By

Published : Jun 11, 2022, 3:40 PM IST

Updated : Jun 11, 2022, 9:32 PM IST

नवी मुंबई :नवी मुंबईतील ( Navi Mumbai ) नेरुळ ( Nerul ) परिसरातील सेक्टर 19 मधील जिमी पार्क इमारतीच्या आतील चार स्लॅब एकापाठोपाठ कोसळल्याची ( Four Slabs collapsed ) घटना घडली आहे. या इमारतीच्या आत असलेल्या 7 जखमींना बाहेर काढण्यात आहे. यामध्ये एक पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

अद्यापही एक महिला स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत समाविष्ट होती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारती खाली करण्याच्या सूचना मुंबई पालिकेने नागरिकांना दिल्या आहेत. मात्र, तरीही नागरिक घरे सोडत नाहीत आणि त्यांना दुर्घटनांना सामोरे जावे लागत असल्याच्या घटना घडत आहेत.

building collapsed

नवी मुंबई नेरुळ परिसरातील सेक्टर 17 मधील जिमी पार्क इमारतीच्या स्लॅबला भगदाड पडल्याने एकापाठोपाठ एक-दोन नव्हे तर चार स्लॅब आतून कोसळले. सद्यस्थितीत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आतापर्यंत सात जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. आणखी एक महिला या ढिगाऱ्याखाली अडकली आहे. तिला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर या इमारतीतील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

6 व्या मजल्यावर घर दुरूस्तीचे काम सुरू होते-घटनास्थळी बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे व आयुक्त अभिजीत बांगर दाखल झाले आहे. आयुक्तांनी घटनेची पाहणी केली आहे. नवी मुंबईत एका इमारतीचा सहाव्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यावर कोसळल्याने सात जणांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बचावकार्य सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे. संबंधित घटनेत 7 लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. सर्वांना जवळील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. यामध्ये 31 वर्षाचा पुरुष मृत्युमुखी पडला आहे. 6 व्या मजल्यावर घर दुरूस्तीचे काम सुरू होते. त्याच वेळी व्हायब्रेटरने लाद्या काढताना स्लॅब कोसळला. त्यानंतर एकावर एक असे 5 स्लॅब कोसळल्याची माहिती मिळाली आहे.

बचाव कार्य युद्ध पातळीवर-आज शनिवारी दुपारी 12: 50 च्या दरम्यान सेक्टर 17 जिमी पार्क इमारतीचा पाचव्या मजल्यावरील स्लॅब तळमाळयावर पडला. या ठिकाणी बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. घटनास्थळी नेरूळ, बेलापूर व वाशी अग्निशमन दलाच्या रेस्क्यू टेंडर उपस्थित आहे. या घटनेत, निशा धर्माणी (48),श्रिया धर्माणी(20),सोनाली गोडबोले( 29), आदित्यराज गोडबोले (15),सौमित्र गोडबोले (50), ललिता त्यागराजन (80), सुब्रमण्यम त्यागराजन(84) व व्यंकटेश नाडर (29) यांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर या घटनेत व्यंकटेश नाडर(29) याचा मृत्यू झाला आहे तर यामधील निशा धर्माणी (48), सुब्रमण्यम त्यागराजन (84) यांना उपचारासाठी नेरुळ मधील डी.वाय.हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. नेरुळ आपत्ती व्यवस्थापन कक्षाने ही माहिती दिली आहे.

हेही वाचा -Stray dog attack in Katol : भटक्या श्वानांच्या हल्ल्यात 5 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू, प्रशासनाच्या दुर्लक्षाचा बळी

Last Updated : Jun 11, 2022, 9:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details