महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Risk of epidemics : मुंबईत पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांचा धोका चिंता वाढली - Malaria

मुंबईमध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे पावसाळ्यात पसरणाऱ्या ( spreading during the rainy season increased) साथीच्या आजारांनी डोके (In Mumbai the risk of epidemics) वर काढले आहे. १ ते १७ जुलै या १७ दिवसांत मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रो, कावीळ व स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळले आहेत. थंडीत पसरणाऱ्या स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढल्याने सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे.

Risk of epidemics
साथीच्या आजारांचा धोका

By

Published : Jul 22, 2022, 7:00 PM IST

मुंबई:मुंबईत १ ते १७ जुलै या १७ दिवसांमध्ये मलेरियाचे २४३, (Malaria) लेप्टोचे ११, डेंग्यूचे ३३, गॅस्ट्रोचे ३४०, हेपेटायटिसचे ३८ (Hepatitis) , चिकनगुनियाचे ० तर एच १ एन १ चे ११ रुग्ण आढळून आले आहेत. जून महिन्यात मलेरियाचे ३५०, लेप्टोचे १२, डेंग्यूचे ३९, गॅस्ट्रोचे ५४३, हेपेटायटिसचे ६४, चिकनगुनियाचे १ तर एच १ एन १ चे २ रुग्ण आढळून आले आहेत. १ जानेवारी ते १७ जुलै २०२२ दरम्यान मलेरियाचे १४८६, लेप्टोचे ४६, डेंग्यूचे १५६, गॅस्ट्रोचे ३२४६, हेपेटायटिसचे २९१, चिकनगुनियाचे ५ तर एच १ एन १ चे १५ रुग्ण आढळून आले आहेत. मागील वर्षी जुलैमध्ये मलेरियाचे ७७६, लेप्टोचे ३७, डेंग्यूचे २८, गॅस्ट्रोचे २९४, हेपेटायटिसचे ४७, चिकनगुनियाचे ० तर एच १ एन १ चे २१ रुग्ण आढळून आले आहेत.


डेंग्यू लेप्टो या आजार पसरण्याचा धोका अधिक असून घर, दुकान व परिसरात पाणी साचू देऊ नये. साथीचे आजार रोखण्यासाठी ७ ते १७ जुलै दरम्यान ७ लाख ७८ हजार ७०९ घरात ९५ हजार २१८ गोळ्यांचे वाटप करण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. पावसाळी आजार रोखण्यासाठी मलेरिया, डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होणार नाही, यासाठी पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये असे आवाहन पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी मुंबईकरांना केले आहे.

१ ते १७ जुलै आकडेवारी
मलेरिया २४३
गॅस्ट्रो ३४०
कावीळ ३८
डेंग्यू ३३
लेप्टो ११
स्वाईन फ्ल्यू ११
एच १ एन १ ११

हेही वाचा : Ganeshotsav In Pune : यंदा होणार निर्बंधमुक्त गणेशोत्सव...कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

ABOUT THE AUTHOR

...view details