महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत १० दिवसांत मलेरिया, गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत दुप्पट वाढ - डेग्यू रुग्ण संख्या मुंबई

मुंबईत कोरोना विषाणू आणि त्याच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असताना साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या १० दिवसांत म्हणजेच २१ ते ३१ डिसेंबर पर्यंत मलेरियाचे २८८, गॅस्ट्रोचे ४३३ तर, डेंग्यूच्या ४० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

Mosquito
डास

By

Published : Jan 4, 2022, 9:22 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोना विषाणू आणि त्याच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असताना साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या १० दिवसांत म्हणजेच २१ ते ३१ डिसेंबर पर्यंत मलेरियाचे २८८, गॅस्ट्रोचे ४३३ तर, डेंग्यूच्या ४० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईत कोरोना, ओमायक्राॅन पाठोपाठ साथीचे आजार वाढल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

हेही वाचा -Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचा स्फोट, २४ तासांत १० हजार ८६० नव्या रुग्णांची नोंद

साथीच्या आजारात वाढ -

मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून आतापर्यंत मुंबईत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. कोरोनाच्या दोन लाटांनंतर कोरोना रुग्णसंख्या कमी झाली होती. मात्र, डिसेंबर महिन्यात त्यात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली आहे. कोरोना, ओमायक्रॉन पसरत असताना २१ ते ३१ डिसेंबर 2021 दरम्यान १० दिवसांत मलेरियाचे २८८, गॅस्ट्रोचे ४३३ तर, डेंग्यूच्या ४० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. वाढते साथीचे आजार पालिकेच्या आरोग्य विभागासाठी चिंतेची बाब ठरत आहे. दरम्यान, एच 1 एन 1 रुग्ण आटोक्यात असून गेल्या १० दिवसांत एकही स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळलेला नाही, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने कळवले.

मुंबईकरांनो काळजी घ्या -

गेल्या दीड वर्षांपासून मुंबईकर कोरोनाविरोधात लढा देत आहेत. मुंबईकर नागरिकांची साथ आणि योग्य उपचार पद्धती यामुळे कोरोनाच्या दोन्ही लाटा रोखण्यात पालिकेला यश आले. परंतु, पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांमुळे मुंबईकरांपुढे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे, कोरोनाला हरवण्यासाठी ज्या पद्धतीने खबरदारी घेतली त्याचप्रमाणे साथीचे आजार रोखण्यासाठी काळजी घ्यावी. तसेच, मुंबईकरांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

१० दिवसांत आढळलेले रुग्ण -

मलेरिया - २८८
गॅस्ट्रो - ४३३
डेंग्यू - ४०
कावीळ - ३०
चिकनगुनिया - १२
लेप्टो - ४
एच 1 एन 1 - ०

हेही वाचा -Maharashtra Corona Case : राज्यात 18 हजार 466 नवे कोरोनाग्रस्त, 20 मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details