महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिलासादायक! मुंबईत दोन महिन्यांत पाच पटींनी कोरोना रुग्ण घटले - Corona News

ऑक्टबरच्या तुलनेत मुंबईत रुग्ण संख्येत पाच पटीने घट झाली आहे. मात्र कोरोनाचा प्रसार आटोक्यात असला तरी ख्रिसमस, नव वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक पर्यटनासाठी गर्दीच्या ठिकाणी गेले आहेत. यामुळे येत्या काही दिवसात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे. सुट्ट्यांमुळे रुग्ण संख्येत फार मोठी वाढ होणार नसली तरी आरोग्य विभाग सज्ज असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली

मुंबईत दोन महिन्यांत पाच पट तर एका महिन्यात तीन पट कोरोनाचे रुग्ण घटले
Mumbai Cororna

By

Published : Jan 1, 2021, 9:39 AM IST

मुंबई- मार्चमध्ये मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाला. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. ऑक्टोबरमध्ये ५० हजार ००६ रुग्णांची नोंद झाली होती. नोव्हेंबरमध्ये २५ हजार ९६० रुग्णांची तर डिसेंबरमध्ये ९ हजार ९७६ रुग्णांची नोंद झाली आहे. नव्याने नोंद होणाऱ्या रुग्णांची ही आकडेवारी पाहता मुंबईत ऑक्टोबरच्या तुलनेत पाच पट तर नोव्हेंबरच्या तुलनेत तीन पट घट झाली आहे. नव्याने आढळून येणारी रुग्ण संख्या कमी झाल्याने मुंबईकरांसाठी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दिलासादायक बाब आहे.

कोरोनाचा प्रसार आणि उपाययोजना -
मुंबईत मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर झपाट्याने रुग्णसंख्या वाढत गेली. हजारोच्या संख्येने दिवसाला रुग्ण नोंद होत असल्यामुळे शेकडो ‘कोरोना हॉटस्पॉट’ आणि प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत होती. यातच नियंत्रणात आलेल्या कोरोनाने धार्मिक सण आणि दिवाळीनंतर पुन्हा उचल खालली होती. वाढत्या कोरोनाच्या प्रसाराचे पालिकेसमोर आव्हान निर्माण झाले होते. मात्र ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत घरोघरी तपासणी, सर्वेक्षण, औषधोपचार, जनजागृतीसह ‘चेस द व्हायरस’ मोहिमेत जास्तीत जास्त रुग्णांच्या निकट संपर्कांचा शोध घेऊन केलेली कार्यवाही, ‘मिशन झिरो’ अंतर्गत वस्त्यावस्त्यांत जाऊन घेतलेली आरोग्य शिबिरे, मास्क न वापरणार्‍यांविरोधात कारवाई, अ‍ॅम्ब्युलन्स आपल्या दारी यासारखे उपक्रम, प्रभावी सॅनिटायझेशन आणि दर्जेदार उपचारांमुळे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले असून रुग्णसंख्या घटल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

ऑक्टोबरच्या तुलनेत मुंबईत पाच पट घट -
ऑक्टोबरअखेर मुंबईत कोरोनाचे २ लाख ५७ हजार ५०० रुग्ण होते. नोव्हेंबरअखेर एकूण २ लाख ८३ हजार ४६० रुग्ण होते. तर ३१ डिसेंबर रोजी एकूण रुग्ण २ लाख ९३ हजार ४३६ आहेत. ऑक्टोबर महिन्यात ५० हजार ००६ रुग्ण आढळून आले आहेत. नोव्हेंबर २५ हजार ९७६ तर डिसेंबर महिन्यात ९ हजार ९७६ रुग्ण आढळून आले आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये कमी रुग्ण आढळले आहेत. डिसेंबरची आकडेवारी पाहता ऑक्टोबरच्या तुलनेत तब्बल पाच पटीने रुग्ण घटले आहेत. तर नोव्हेंबरच्या तुलनेत तीन पटीने रुग्ण घटले आहेत.

अशी सुधारली स्थिती -
३१ ऑक्टोबरला रुग्ण दुपटीचा कालावधी १६४ दिवस इतका तर सरासरी दर ०.४२ टक्के होता. रुग्ण बरे होण्याचा कालावधी ८८ टक्के होता.
३० नोव्हेंबरला रुग्ण दुपटीचा कालावधी २०७ दिवस तर सरासरी दर ०.३४ टक्के इतका झाला. रुग्ण बरे होण्याचा दर ९१ टक्के इतका झाला. तर डिसेंबर महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी ३६४ दिवस तर सरासरी दर ०.२१ टक्के इतका झाला. रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्के इतका झाला.

रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता -
मुंबईत रुग्णसंख्येत घट झाली आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात असला तरी ख्रिसमस, नव वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक पर्यटनासाठी गर्दीच्या ठिकाणी गेले आहेत. यामुळे येत्या काही दिवसात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे. सुट्ट्यांमुळे रुग्ण संख्येत फार मोठी वाढ होणार नसली तरी आरोग्य विभाग सज्ज असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details