मुंबई -मुंबईत कोरोना ओमायक्रॉनचे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या मुंबई पोलिसांनाही कोरोनाने घेरले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. (Mumbai Police Corona positive for COVID-19) मुंबईतील तब्बल (Mumbai Police Corona positive) 24 तासात 70 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरण्याची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत मुंबई पोलिसांतील (Corona Situation In Mumbai) एकून 256 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
50 ते 60 वर्षावरील पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना गर्दीच्या ठिकाणी ड्युटी न लावण्याचे आदेश
मुंबई पोलिसांकडून पोलीस कर्मचाऱ्यांना BP, डायबिटीस तसेच इतर काही आजार असल्यास त्या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्याचे आदेश देखील पोलीस विभागातर्फे संबंधित विभागाला देण्यात आले आहे. (Mumbai Police Corona Handle situation) 50 ते 60 वर्षावरील पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना गर्दीच्या ठिकाणी ड्युटी न लावण्याचे आदेश देखील पोलीस महासंचालक विभागातर्फे देण्यात आले आहेत.
दुसऱ्या लाटेमध्ये खबरदारी घेत गृह विभागाने या सूचना
कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी अधिकारी यांचा मृत्यू देखील झाला होता. त्यामुळे गृह विभागाने कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये खबरदारी घेत गृह विभागाने या सूचना पोलीस अधिकार्यांना देण्यात आल्या आहे.