महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचे 529 नवे रुग्ण, 6 रुग्णांचा मृत्यू - News about Mumbai Corona patient

मुंबईत आज कोरोनाचे 529 नवे रुग्ण आढळले असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 496 दिवस इतका आहे.

In Mumbai, 529 new corona patients, 6 patients have died
मुंबईत कोरोनाचे 529 नवे रुग्ण, 6 रुग्णांचा मृत्यू

By

Published : Feb 13, 2021, 8:53 PM IST

मुंबई - शहरात मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या दहा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. शनिवारी मुंबईत कोरोनाचे 529 नवे रुग्ण आढळून आले असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.


कोरोना रुग्णांची आकडेवारी -


मुंबईत आज 529 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 13 हजार 431 वर पोहचला आहे. आज 6 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 413 वर पोहचला आहे. 542 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 2 लाख 95 हजार 866 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 5276 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 496 दिवस -


रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 496 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 122 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 1 हजार 488 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 29 लाख 98 हजार 180 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -


मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details