मुंबई : मुंबईतील माहीम परिसरात कचराकुंडीमध्ये दोन दिवसांचे बाळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात भादंवि कलम 318 अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, माहीममधील घटनेनंतर पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून बाळाला कचराकुंडीमध्ये टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
पोलिसांकडून चौकशी सुरू : यासंदर्भातील पोलिसांच्या माहितीनुसार, कचराकुंडीमध्ये दोन दिवसांचे बाळ टाकण्यात आल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांकडून घटनास्थळी दाखल होत परिसरात तपास सुरू केला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून कचराकुंडीमध्ये बाळ कोणी टाकले याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. अद्याप या व्यक्तीचा शोध अद्याप लागलेला नाही आहे. मुंबईतील माहीम परिसरात एका डस्टबिनमध्ये दोन दिवसांचे बाळ सापडले आहे. पोलिसांना सोमवार रोजी मिळालेल्या माहितीनुसार,