मुंबई - महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) हे नाराज असून ते गुजरातमध्ये केलेले आहेत. यावरून महाराष्ट्रात मोठे राजकारण तापले आहे. दरम्यान शरद पवार हे दिल्लीवरून शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येत आहेत. तेच महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय भूकंपानंतर ( Maharashtra Political Crisis ) काँग्रेस आमदारांची बैठक घेण्यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी दाखल झाले ( Congress MLA Meeting ) आहेत. यावेळी ते म्हणाले की, आमचे सर्व ४४ आमदार एकत्र असून आमच्यामध्ये एकजुटता आहे. महाराष्ट्रातील घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. मी माझ्या वरिष्ठ नेत्यांची संपर्कात आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत बोलणे झालेले नाही.
आमचे ४४ आमदार एकजूट -याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, आमचे सर्व ४४ आमदार एकत्र असून आमच्यामध्ये एकजुटता आहे. महाराष्ट्रातील घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. मी माझ्या वरिष्ठ नेत्यांची संपर्कात आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत बोलणे झालेले नाही. मी माझ्या वरिष्ठ नेत्यांशी त्याचबरोबर आमदारांची बोलण्यासाठी इथे आलेलो आहे. ज्या पद्धतीने सध्या घडामोडी होत आहेत. त्या पाहता पण मला असे काही वाटत नाही की, महाविकासआघाडी सरकारला काही धोका निर्माण होईल, अशा पद्धतीची परिस्थिती सध्या तरी दिसत नाही आहे. आमच्यात काही मतभेद नाही आहेत. आम्ही आमच्या मंत्र्यांशी व आमदारांशी चर्चा करत असतो. त्यांना भेटत असतो, त्यांना भेटण्यासाठी आलो आहे.