महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nari Shakti : महाराष्ट्राच्या राजकारणात महिला नेत्यांनच्या कार्यशैलीचा ठसा - Kishori Pednekar

राजकारण क्षेत्रावर नेहमीच पुरुषांचा दबदबा राहिला ( Politics Of Maharashtra ) आहे. मात्र असे असले तरी या क्षेत्रात काही महिला नेत्यांनी आपल्या वेगळ्या कार्यशैली ठसा राज्यभर नाही तर देशभर उमटवला आहे. गेल्या तीन वर्षात दोनदा झालेल्या सत्तांतरानंतरही या महिला नेत्यांनी ( women Leaders ) आपल्या कामाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Women leaders
राजकारण क्षेत्रावर ठसा उमटवणाऱ्या महिला नेत्या

By

Published : Aug 10, 2022, 4:27 PM IST

Updated : Aug 11, 2022, 9:37 AM IST

मुंबई -देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतो आहे. "हर घर तिरंगा" च्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचे अभियान केंद्र सरकारने या वर्षी सुरू केल आहे. या अभियानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या यशस्वी महिला आणि पुरुष अशा नामवंत व्यक्तींचा लेखाजोखा ETV टीव्ही भारत च्या माध्यमातून घेतला जात आहे.महाराष्ट्राचे राजकारण ( Maharashtra politics ) सध्या देशाला ढवळून काढणारा आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात दोन वेळा अक्कलकोट असे सत्ताबदल झाले. यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी भारतीय जनता पक्षाची काडीमोड घेत विचारांशी विसंगत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा दोन पक्षाशी आघाडी करत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारांशी विसंगत असलेल्या पक्षाशी आघाडी केल्यामुळे एकनाथ शिंदे गटाने पक्षातच बंड पुकारत भारतीय जनता पक्षाची हातमिळवणी केली आणि राज्यांमध्ये नवीन सरकार स्थापन केले. असे दोन वेळा अचंबित करणारे सत्तापालट राज्यामध्ये झाले असले तरी, राज्याच्या राजकारणात महिला नेत्यांनीही आपला ठसा ठेवला आहे. केवळ राज्यातच नाही तर देशभरात महाराष्ट्राच्या मुलींचा दबदबा आहे. आशाकाही राजकीय महिला नेत्यांचा जीवन प्रवास या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे.




राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे -महाराष्ट्राच्या आणि देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या राजकीय नाव म्हणजे शरद पवार. याच शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर आपल्या कामाने एक वेगळा ठसा उमटवला आहे. नेहमीच भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या निती विरोधात आक्रमकपणे त्या लोकसभेमध्ये आणि सामाजिक मंचावर प्रश्न मांडत असतात. महाराष्ट्रातला एक प्रभावशाली महिला नेतृत्व म्हणून सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांच्याकडे महाराष्ट्र आणि देश पहात आहे. सुप्रिया सुळे यांचा जन्म 30 जून 1969 रोजी पुणे येथे झाला. पवार दाम्पत्याला सुप्रियाताई हे एकमेव आपत्य आहे. सुप्रिया सुळे यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. सदानंद सुळे यांच्याशी सुप्रिया सुळे यांचा विवाह झाला.




पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार -2006 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे या खासदार म्हणून निवडून आल्या. तेव्हापासून आजतागायत त्या मतदार बारामती संघात त्यांनी आपला विजय कायम ठेवला आहे. राजकारणातही महिलांना पुरुषानं एवढीच संधी मिळावी यासाठी त्या नेहमीच झगडत असतात. महिलांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्या नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत. तसेच विरोधी पक्षातील खासदार म्हणून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर नेहमीच आक्रमकपणे आपली मतं मांडत असतात.




भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे -पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) ज्यांनी आपल्या नेतृत्व शैलीने फक्त राज्यातच नाही तर देशभरात ओळख निर्माण केली आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या असल्या तरी त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. 26 जुलै 1979 साली बीड जिल्ह्यातील परळी येथे त्यांचा जन्म झाला. पंकजा मुंडे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून 2012 साली केली. 2009 साली त्या परळी मतदार संघातून महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून आल्या. त्यांनी 31 ऑक्टोबर 2014 रोजी महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हा त्यांना ग्रामविकास, महिला व बालकल्याण खाते देण्यात आले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. सध्या भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेश प्रभारी म्हणून केंद्रीय पातळीवर काम करत आहे. ओबीसी नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे राज्यामध्ये ओबीसी आरक्षण केल्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. ओबीसी समाजाचे प्रश्न आक्रमकपणे मांडण्याचा त्या प्रयत्न करतात.



केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार -महाराष्ट्राच्या राजकारणात डॉ भारती पवार ( Dr. Bharti Pawar ) हे नाव अत्यंत अल्पावधीत कुशल महिला नेत्यांमध्ये गणले जात आहे. डॉक्टर भारती पवार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदार संघात खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर गेल्या वर्षी झालेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर अविश्वास दाखवत महाराष्ट्रातील केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री म्हणून त्यांची वर्णी लावली. लोकसभेत एक हुशार खासदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 2019 मध्ये त्यांना "बेस्ट वूमन पार्लमेंट" च्या किताबाने देखील गौरव करण्यात आला. भारती पवार ह्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या याचिका आणि सल्लागार समितीच्या समितीवरही सदस्य आहेत. डॉ. पवार यांनी देशातील कुपोषण निर्मूलनासाठी काम केले आहे.


डॉक्टर भारती पवार या कळवण तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांचे पती प्रवीण पवार हे अभियंता आहेत. सासरे तत्कालीन आदिवासी मंत्री स्व.ए.टी. पवार हे अत्यंत लोकप्रिय व विकासकामांमुळे परिचीत झालेले नेते होते. भारती पवार सलग दोन वेळा उमराणे व मानूर गटातून जिल्हा परिषद सदस्य झाल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या प्रदेश उपाध्यक्षही होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या त्या सक्रीय व आक्रमक पदाधिकारी राहिल्या आहेत. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. पवार यांना उमेदवारी दिली होती. त्यात त्यांचा परावभव झाला.




महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर -महाविकास आघाडी सरकारमध्ये माजी महिला व बालविकास मंत्री ( Minister for Women and Child Development ) यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur )यांना देखील राज्यात आक्रमक महिला नेतृत्व म्हणून पहिले जाते. मूळच्या तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी इथल्या आहेत. कायद्याचं शिक्षण घेतलेल्या ऍड. यशोमती ठाकूर ह्या 2009 पासून झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सलग तीन वेळा काँग्रेस पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत. वडील भैय्यासाहेब उर्फ चंद्रकांत ठाकूर यांच्याकडून त्यांना राजकीय वारसा लाभला आहे. त्यामुळे लहानपणापासूनच यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या विचाराने प्रभावित होत्या. त्यामुळे त्यांनीही काँग्रेस संघटनेत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्या महिला व बालविकास मंत्री या पदापर्यंत पोहोचल्या. 2004 ते 2009 मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिवपदी निवड झाली. या दरम्यान राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी काम करण्याची संधी त्यांना मिळाली. यशोमती ठाकूर या अनेक वेळा आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत आल्या आहेत. मात्र आपली भूमिका ठोसपणे सांगणार्‍या म्हणूनही त्यांची राजकारणात ओळख आहे.



खासदार नवनीत राणा -2019 चाली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावतीतील अपक्ष खासदार म्हणून निवडून आलेल्या नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अपक्ष खासदार म्हणून निवडून आले असले तरी त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात देवेंद्र फडवणीस सरकार येणार असे वाटत होते. मात्र शिवसेनेने महाविकास आघाडी सरकार आपण केल्यानंतर नवनीत राणा यांनी राज्यातील महा विकास आघाडी सरकारवर अनेक वेळा आक्रमकपणे आरोप केले आहेत. खास करून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरा बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याच्या मुद्द्यावरून संपूर्ण देशभरात राजकीय खळबळ खासदार नवनीत राणा यांनी उभी केली होती. लोकांमध्ये जात आक्रमक पणे सामाजिक प्रश्न मांडण्याचा त्या नेहमीच प्रयत्न करत असतात. 2014 खाली प्रथमता राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्या वेळी त्यांचा पराभव झाला होता. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी भरली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा गेट लोकसभेवर निवडून आल्या. नवनीत राणा यांचा जन्म मुंबई येथे झाला आहे. बारावी पर्यंत मुंबई शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मॉडलिंग आणि अभिनय क्षेत्रात आपला करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी तामिळ, कन्नड पंजाबी चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केल आहे. 2011साली अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्या सोबत त्यांनी विवाह केला.





मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर -मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर ( Kishori Pednekar ) यांनी देखील आपल्या कामाच्या जोरावर महाराष्ट्राच्या राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शासकीय रुग्णालयातील परिचारिका चे मुंबईच्या महापौर पदा पर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. परिचारिका म्हणून काम करत असताना शिवसेना संघटनेमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली. शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी मध्ये ते अग्रेसरपणे काम करत होत्या. त्यांच्या कामावर प्रभावित होऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये संधी दिली. 2002 साली पहिल्यांदा वरली येथून नगरसेविका म्हणून निवडून आल्या. किशोरी पेडणेकर यांनी उपविभाग संघटक, विभाग संघटक, सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्क संघटक अशा पदांवर काम केले. 2002 मध्ये पहिल्यांदा नगरसेवकशिवसेनेच्या उपविभाग संघटक, विभाग संघटक, सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्क संघटकपदी काम केलेल्या किशोरी पेडणेकर 2002 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यांना प्रभाग समिती अध्यक्षा, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदाचा कार्यभारही सोपविण्यात आला. 2012 आणि 2017 मध्ये पुन्हा नगरसेविका2007 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली नाही. मात्र, 2012 आणि 2017 मध्ये त्या पुन्हा नगरसेविका म्हणून निवडून आल्या. 2012 मध्ये त्यांनी शहर स्थापत्य समिती अध्यक्षा, सुधार-स्थायी समिती सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळल्या आहेत.




विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोर्हे -शिवसेना नेता आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कामाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात नीलम गोर्हे यांनी केली. राज्यभरात कोठेही महिलांवर अन्याय होत असेल तर सर्वात प्रथम नीलम गोर्हे ह्या आवाज उठवतात. पीडित महिलेला न्याय मिळवून दिल्यामुळे महिला वर्गांमध्ये नीलम गोर्हे यांचा एक विशेष आदर आहे


55 वर्षानंतर विधान परिषदेच्या उपसभापती पदी बसण्याचा मान नीलम गोर्हे यांना -नीलम गोऱ्हे ( Neelam Gorhe ) यांनी ते एमबीबीएस पदवीचे शिक्षण घेतले आहे. 1992 मध्ये त्यांनी बँकॉक येथील एशियन लोकविकास संस्थेत प्रशिक्षण विषयक डिप्लोमाही पूर्ण केला. 1987 साली पुण्यातून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सोबत देखील काम केलं. मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ओळख मिळाली ती शिवसेनेच्या माध्यमातून. 2002 पासून च्या विधान परिषदेच्या सदस्य आहेत. 2019 मध्ये नीलम गोर्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापती पदी निवड झाली. ते आजतागायत विधान परिषदेच्या उपसभापतीपदी आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल 55 वर्षानंतर विधान परिषदेच्या उपसभापती पदी बसण्याचा मान नीलम गोर्हे यांना मिळाला. युतीचे सरकार असताना अनेक वेळा त्यांना मंत्रीपद दिले जाईल अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत्या. मात्र अनेक वेळा मंत्री बदाने त्यांना हुलकावणी दिली. मात्र असं असलं तरी, त्यांनी आपलं राजकीय आणि सामाजिक काम कधीही थांबवलं नाही. तसेच शिवसेना पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विरोधात मोठं बंड पुकारल गेलं. मात्र एक महिला नेत्या म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे नीलम गोर्हे उभे असलेल्या अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.

हेही वाचा :Nari Shakti : लेडी सिंघम; पोलीस अधीक्षक सातपुते यांची सोलापूरात 'तेजस्वी' कामगिरी

Last Updated : Aug 11, 2022, 9:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details