मुंबई -गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने मुंबईतील अनेक चाकरमान कोकणात जाण्यासाठी निघालेले आहेत. गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतानाच यावर्षी शिंदे सरकारने कोकणात जाणाऱ्या चाकरमाण्यांना टोल माफ केला आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमानी फक्त संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पास बनवून घेतल्यानंतर त्यांना टोलवर कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही, यासाठी आजपासून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये टोल मोफत पास देणे सुरुवात झाली आहे.
माहिती देताना पोलीस अधिकारी महाराष्ट्र शासनातर्फे गणेशोत्सवादरम्यान कोकणाला जाणाऱ्या भाविकांना टोल नाक्यांवर वाहन टोलमध्ये सवलत देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून 26 ऑगस्ट रोजी शासनादेश निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने मुंबईच्या प्रत्येक पोलीस स्टेशन आणि आरटीओ कार्यालयामधून निशुल्क टोल फ्री वाहनपास वितरित करण्याची सुरुवात आजपासून झाली आहे.
कोकणात गणेश उत्सवासाठी जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मुंबईत राहणारे कोकणवासी किंवा महाराष्ट्राच्या इतर भागात राहणारे ज्यांना कोकणामध्ये गणेशोत्सव दरम्यान जायचे असेल त्यांना सरकारतर्फे वाहन टोल माफीचा पास दिला जात आहे. त्या पासच्या वापर करून टोल नाक्यावर भाविकांना टोल भरावा लागणार नाही. मात्र, त्यासाठी ज्यांना गणेशोत्सव साठी कोकणात जायचे आहे त्यांना पोलीस स्टेशन किंवा आरटीओ कार्यालयामध्ये रीतसर अर्ज करावा लागणार आहे. त्याचबरोबर गाडीचे आवश्यक कागदपत्र आणि ज्यांना जायचे आहे त्यांचे नाव द्यावा लागेल त्यानंतर आवेदन करणाऱ्या भाविकांना निशुल्क पास देण्यात येणार आहे. राज्य सरकारतर्फे कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधांसाठी सुरू करण्यात आलेली टोल माफीची ही योजना 27 ऑगस्टपासून 11 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. कोकणात ज्या भाविकांना गणेश भक्तांना जायचे असेल त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात आला आहे .
हेही वाचा -रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची ईडीकडून चौकशी सुरु