महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Today Meeting Govt : सायंकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक - आज महाविकास आघाडीची मिटींग होणार

अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी आज सायंकाळी साडेसात वाजता महा विकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची आणि नेत्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे. (Important meeting leaders of Mahavikasaghadi) अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी सायंकाळी सात वाजता ही बैठक पार पडेल अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जलसंपदा मंत्री अर्थमंत्री जयंत पाटील
जलसंपदा मंत्री अर्थमंत्री जयंत पाटील

By

Published : Mar 2, 2022, 12:20 PM IST

मुंबई - उद्यापासून सुरू होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी आज सायंकाळी साडेसात वाजता महा विकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची आणि नेत्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे. (leaders of Mahavikasaghadi ) अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी सायंकाळी सात वाजता ही बैठक पार पडेल अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अर्थसंकल्पीय अधिवेशन बाबत महत्त्वाची चर्चा

उद्यापासून सुरू होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल. (Jayant Patil On Govt ) तसेच या अर्थसंकल्पी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार असून याबाबत रणनीती देखील याच बैठकीत आखली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्या होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशन बाबत महत्त्वाची चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक बोलावली असल्याचाही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

...पण नेहमीप्रमाणे विरोधक चहापानाला येणार नाहीत

अधिवेशन आधी विरोधकांना चहापानाचे आमंत्रण दिले जाते. मात्र, खोटेनाटे आरोप राज्य सरकारवर करायचे, त्या आरोपांबाबत गोंधळ घालायचा असे विरोधी पक्ष करत आहे. आज राज्य शासनाकडून विरोधकांना चहापानाचा आमंत्रण दिले जाईल. मात्र, विरोधक चहापानाला येणार नाहीत असेच दिसत आहे. अशी खरमरीत टीका विरोधकांवर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केली. पण विरोधकांनी चहापानाला नक्की यावे असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले आहे.

आर्यन खानकडे ड्रग्स नव्हते, एसआयटीच्या रिपोर्ट मधून समोर

अभिनेता शाहरुख खान याच्या मुलांकडे ड्रग्स नव्हते हे आता एसआयटीच्या रिपोर्ट मधून देखील समोर आल आहे. एनसीबीने आर्यन खानवर केलेल्या याच कारवाईचा विरोध नवाब मलिक सातत्याने करत होते. म्हणूनच त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.

मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही

भारतीय जनता पक्षाकडून नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही. हे महाविकास आघाडीकडून अधिच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे त्यावर चर्चा नको. तसेच मलिक यांचा राजिनामा घेतला जाणार नाही असा पुनरुच्चारही पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा -School Starts In Mumbai : हुश्श..उघडल एकदाच ज्ञानमंदिर! आजपासून मुंबईत शाळा सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details