मुंबई -कॅन्सरचे प्रमाण है समाजात वाढत आहे याला कारणीभूत असणाऱ्या घटकांमध्ये व्यसने, लठ्ठपणा ,अन्न घटकांची कमतरता ,जुनाट संसर्ग यांचा समावेश आहे. या सोबतच दुर्बल रोगप्रतिकार क्षमता (इम्युनिटी) हे आपल्या शरीराचे कॅन्सर सारख्या आक्रमणापासून बचाव करतात. त्यामुळे शरीर जागृत करणारी इम्यूनोथेरेपी ही कॅन्सरच्या पेशंटसाठी प्रभावी ठरू शकते असे मत मेडीकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. दत्तात्रय अंदुरे यानी व्यक्त केले. जागतिक कर्करोग जागृती दिनानिमित्त ( World Cancer Day 2022 ) कर्करोगावरील उपचार पद्धतीविषयी जाणून घेऊया
अगदी चौथ्या टप्प्याचा कॅन्सरवर इम्यूनोथेरेपीद्वारे उपचारपद्धतीने उपचार करता येतात. कॅन्सर हा आजार एखादया खोलवर मुळे गेलेल्या वटवृक्षासारखा असतो. त्यामुळे ज्याप्रकारे एखादा वटवृक्ष काढण्यासोबत त्याचे मुळे काढणे गरजेचे असते. त्याप्रमाणे कॅन्सर बरा करण्यासाठी शस्त्रक्रियेनंतर गरजेनुसार केमोथेरपी व रेडिएशन थेरपी या उपचार पद्धतीने कॅन्सरची पूर्ण ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे, असे मत मेडीकल ऑन्कोलॉजिस्ट (कॅन्सर तज्ञ) डॉ. दत्तात्रय अंदूरे यांनी व्यक्त केले. वेळीच निदान व उपचार केल्यास कॅन्सर बरा होऊ शकतो.