मुंबई -नियमावलीचे पालन करत आज अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना निरोप देण्यात येत आहे. सकाळी दहा वाजता गणेश गल्ली गणेशोत्सव मंडळच्या मंडपातून मुंबईचा महाराजा विसर्जन मिरवणुकीला बाहेर पडला. यावेळी पुष्पगुच्छांचा वर्षाव फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषात बाप्पाला निरोप देण्यासाठी लालबाग परळमधील गणेश भक्तांनी गर्दी केली होती.
पोलिसांच्या बंदोबस्तात बाप्पाची विसर्जन मिरवणूक -
मुंबईसह महाराष्ट्रात दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. आगमनापासून अनंत चतुर्दशीपर्यंत मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्जा केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतो. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने काही नियमावली तयार केली आहे. या नियमावलीचे पालन करत आज अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना निरोप देण्यात येत आहे. सकाळी दहा वाजता गणेश गल्ली गणेशोत्सव मंडळच्या मंडपातून मुंबईचा महाराजा विसर्जन मिरवणुकीला बाहेर पडला. पुष्पगुच्छ यांचा वर्षाव फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषात बाप्पाला निरोप देण्यासाठी लालबाग परळमधील गणेश भक्तांनी गर्दी केली होती. मात्र, कोरोनामुळे पोलिसांनी भक्तांना बाप्पासोबत जाण्यास मनाई केली आहे. त्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात बाप्पाची विसर्जन मिरवणूक पुढे निघाली.
हेही वाचा - दगडूशेठ गणपतीचे साडेसहाला विसर्जन, घरबसल्या सोहळा असा पाहा ऑनलाईन