महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Monsoon Update : ऑगस्ट आणि सप्टेंबर 2022 मध्ये देशातील 'या' भागात ऊन तर 'या' ठिकाणी पडणार पाऊस - rainfall

Monsoon Update : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात, पश्चिम मध्य आणि वायव्य भारताच्या बहुतेक भागांमध्ये आणि ईशान्य भारताच्या उत्तर भागात सामान्य कमाल तापमानाची शक्यता आहे.

Monsoon Update
Monsoon Update

By

Published : Aug 2, 2022, 10:50 AM IST

मुंबई - ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात, पश्चिम मध्य आणि वायव्य भारताच्या बहुतेक भागांमध्ये आणि ईशान्य भारताच्या उत्तर भागात सामान्य कमाल तापमानाची शक्यता आहे. तर पावसाचा विचार केल्यास, सप्टेंबर 2022 मध्ये देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. सप्टेंबर 2022 मधील तापमान आणि पाऊस कसा राहणार याबाबत भारतीय हवामान खात्याने (IMD) अंदाज वर्तवला आहे.

तापमान-मे महिन्यात, पश्चिम मध्य आणि वायव्य भारताच्या बहुतेक भागांमध्ये आणि ईशान्य भारताच्या उत्तर भागात सामान्य कमाल तापमानाची शक्यता आहे. देशाच्या उर्वरित भागात सामान्य ते सामान्य कमाल तापमानापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात, वायव्य, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारताच्या बहुतांश भागात सामान्य किमान तापमानाची शक्यता आहे. तर दक्षिण द्वीपकल्पीय भारत आणि अत्यंत वायव्य भारताच्या काही भागात सामान्य तापमान असण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर महिन्यात पावसाबाबत हवामान खात्याचे काय म्हणणे आहे? -सप्टेंबर 2022 मध्ये देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. वायव्य भारतातील काही भाग आणि ईशान्य भारतातील काही भाग तसेच अति आग्नेय द्वीपकल्प वगळता भारताच्या बहुतेक भागांमध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -Who is Al Zawahiri? लादेनचा सहकारी, अमेरिकेचा कट्टर शत्रू अल जवाहिरी कोण होता? जाणून घ्या..

ABOUT THE AUTHOR

...view details