मुंबई- मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान ( IMD alert for Mumbai ) विभागाने वर्तवली आहे. दरम्यान मुंबईत रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात ( Mumbai rain update ) आली आहे. गेल्या चार दिवसापासून मुंबई, ठाणे आणि मुंबई उपनगर येथे परतत असलेल्या जोरदार पावसानंतर आज सकाळपासूनच पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे.
इतक्या पावसाची नोंद -मुंबईत काल १४ जुलै सकाळी ८ ते आज १५ जुलै सकाळी ८ या २४ तासात शहर विभागात ३०.२६, पूर्व उपनगरात ४८.९२ तर पश्चिम उपनगरात ५१.३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईच्या समुद्रात दुपारी १.२२ वाजता ४.८७ तर १६ जुलैला मध्यरात्री १.१९ वाजता ४.३० मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता ( Mumbai rain today ) आहे. या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
वेगवान वारे वाहणार -मुंबईत मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे तीन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला ( orange alert in Mumbai ) आहे. या कालावधीत मुंबईत मुसळधार पाऊस पडेल. तसेच ताशी ४५ ते ५५ किंवा ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात असा इशारा हवामान विभागाने दिला असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.