महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

IMA President Dr Avinash Bhondve on Swine Flu राज्यात स्वाईन फ्लूमुळे 43 रुग्णांची मृत्यू, कोविड १९ अजून पूर्ण गेलेला नाही, डॉ अविनाश भोंडवे - IMA President Dr Avinash Bhondve on Swine Flu

राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात स्वाईन फ्लू अर्थात एचवन एनवन याने बाधित झालेल्या रुग्णांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या मोठ्या शहरातील अधिक आहे. जानेवारी 2022 पासून ते ऑगस्टपर्यंत 1449 लोक स्वाइन फ्लूग्रस्त आढळलेले आहेत. त्याच्यापैकी 43 नागरिकांचा संसर्गामुळे मृत्यू झाल्याचे समोर आलेले IMA President Dr Avinash Bhondve आहे.

IMA President  Dr Avinash Bhondve
आयएमए अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे

By

Published : Aug 23, 2022, 1:55 PM IST

मुंबई राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून Increase in Swine Flu Patients in State आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात स्वाईन फ्लू अर्थात एचवन एनवन याने बाधित झालेल्या रुग्णांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या मोठ्या शहरातील Swine Flu Patients are Increase in Main City of State अधिक आहे. जानेवारी 2022 पासून ते ऑगस्टपर्यंत 1449 लोक स्वाइन फ्लूग्रस्त आढळलेले आहेत. त्याच्यापैकी 43 नागरिकांचा संसर्गामुळे मृत्यू झाल्याचे समोर आलेले IMA President Dr Avinash Bhondve आहे.

राज्यात स्वाईन फ्लू


मोठ्या शहरात बाधित रुग्ण अधिकराज्यामध्ये स्लाईन फ्लूची मोठी साथ सुरू आहे. या साथीमध्ये राज्यातील महानगर आणि मोठी शहरे यांना या आजाराने विळखा घातला आहे. राज्यामध्ये एकूण 43 मृत्यू स्वाईन फ्लूमुळे झालेले आहेत. या मृतांमध्ये पुण्यामध्ये तेरा नागरिक, नाशिकमध्ये सहा आणि ठाण्यामधील पाच, तर नागपूर येथील चार जणांचा समावेश आहे. 2009 नंतर जी साथ आली होती, त्यात महाराष्ट्रात 3735 मृत्यू झाले होते. राज्याच्या आरोग्य विभागाच्या सांख्यिकीनुसार आतापर्यंत सुमारे 13 वर्षात एकूण 35,407 लोकांना या स्वाइन फ्लूच्या आजाराची लागण झाली या एकूण लागण झालेल्या रुग्णांमध्ये पुण्यात स्वाईन फ्लूचे 361 तर मुंबई 291 तर ठाण्यात 225 रुग्ण आढळलेल्या आहेत.


जणू काही कोविड आणि त्याचे व्हेरियन्ट संपले आहे असे आपले वर्तन यासंदर्भात या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर अविनाश भोंडवे माजी Dr Avinash Bhondve on Swine Flu Statment आयएमए अध्यक्ष IMA President Dr Avinash Bhondve यांच्याशी ईटीव्ही भारतने संपर्क साधला असता, त्यांनी याबद्दलची निरीक्षण नोंदवले. शासन आणि समाज दोघेही या वेरियंटपासून धोका नाही, असे समजतात आणि निर्धास्त झालेले आहेत. तसेच जनतेने सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणे बिलकुल बंद केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे की आपण सर्दी, खोकला आणि जास्त दिवस ताप, कफ झालेला असूनही आरटीपीसीआर आणि इतर चाचण्या करणे सोडून दिलेले आहे. त्यामुळे या एचवन एनवन किंवा तत्सम ओमायक्रोनची नवीन व्हेरियंट आहे. ते जणू काही भारतातून पळून गेले, अशा रीतीने आपण वागत आहोत. त्यामुळे आपण काळजी घ्यायला हवी.


निमोनियाशी संबंधित गंभीर तीव्र श्वसनाचे आजारात वाढ, साथीच्या आजारांचे निदान आवश्यक साथीच्या आजाराने महाराष्ट्रामध्ये एकूणच साथीच्या आजारांच्या विषयी लक्ष ठेवणे आणि आजाराची निदान वेगाने होणे यासाठी प्रयोगशाळांचे जाळे विणणे त्यासाठी शासन प्रयत्न करणे गरजेचे आहे. मग आजार कोविड असो किंवा स्वाईन फ्लू, असो अशी माहिती डॉक्टर प्रदीप आवटे यांनी दिली. नोबल हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात 15 रुग्णांच्या मागे एकाला कोविड आहे. तर 14 रुग्णांना एचवन एनवन या व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला आहे. नोबल हॉस्पिटलचे डॉक्टर अमित द्रविड यांनी सांगितले. आम्हाला निमोनियाशी संबंधित गंभीर तीव्र श्वसन असलेल्या आणि त्या प्रकारचे सिंड्रोम असलेले रुग्ण मिळत आहेत. आम्ही या सगळ्यांवर लक्ष ठेवून आहोत तर डॉक्टर प्रदीप डिकोस्टर म्हणाले, 'हॉस्पिटलमध्ये निमोनिया झालेल्या पाच लोकांपैकी तीन जणांना स्वाईन फ्लू आहे.

हेही वाचा Increasing Swine Flu in Nagpur नागपुरात स्वाईन फ्लूचे रुग्ण 200 पार, 10 जणांचा मृत्यू

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details