पुणे- महाराष्ट्र सरकारने राज्यातील खासगी डॉक्टरांच्या कोविड रुग्णलयाचे दर निश्चित केले होते. एकीकडे दर परवडत नसल्यामुळे सरकारने सुधारणा करणे अपेक्षित होते. मात्र, ते न करता तसेच खासगी डॉक्टरांच्या कुठल्याही मागण्या किंवा अडचणी या समजून न घेता सरकारने सतत त्यांना एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक दिली. त्यामुळे या सर्व गोष्टींच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राने राज्यातल्या सर्व शाखांमध्ये आंदोलन सुरू केले असल्याचे आयएमएने सांगितले आहे.
'सरकारच्या खासगी डॉक्टरांबाबतच्या धोरणामुळे आयएमएचा आंदोलनाचा पवित्रा' - आयएमए न्यूज
कोरोनाविरुद्ध लढताना मृत्यू झालेल्या डॉक्टरांना आयएमएकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अविनाश भोंडवे - अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र
आंदोलन सुरू करण्याआधी कोरोनाविरुद्ध लढताना मृत्यू झालेल्या डॉक्टरांना आयएमएकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कोरोनाविरोधात लढताना मृत्यू झालेल्या डॉक्टरांची थोडी आठवण ठेवावी आणि डॉक्टरांवर होणारा अन्याय दूर करावा. यासाठी हा लढा आहे, असे आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष अविनाश भोंडवे यांनी सांगितले.