मुंबई - देशाच्या आर्थिक राजधानीत अंमली पदार्थ तस्करांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र आहे. शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत गेल्या 19 महिन्यांमध्ये 1089 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, आतापर्यंत एकूण 1073 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून माहिती अधिकारात समोर आलेल्या माहितीत ही बाब स्पष्ट झाली असून, शहर पोलिसांच्या हद्दीत अंमली पदार्थाचा वापर वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे.
शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत गेल्या 19 महिन्यांमध्ये 1089 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आतापर्यंत पोलिसांच्या कारवाईत हेरॉईन, चरस, कोकेन, गांजा, एमडी, एलसीडी या अंमली तसेच उत्तेजक पदार्थांचा समावेश आहे.
1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत हेरॉईन, चरस, कोकेन, गांजा, एमडी, एलसीडी हे पदार्थ 1363 किलो 3241 ग्रॅम 1364 मिली ग्रॅम जप्त केले आहेत. हस्तगत केलेल्या या मुद्देमालाची किंमत 1016 कोटी 32 लाख 56 हजार रुपये असून यामध्ये एकूण 395 आरोपींना अटक झाली होती. यामधील सर्वाधिक आरोपी गांजाचे सेवन करत असून त्यांची संख्या 194 आहे.
1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत 64 कोटी 64 लाख 62 हजार 352 रुपये किंमतीचे 169 किलो 4150 ग्रॅम 1282 मिली ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. यंदा आरोपींच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असून, एकूण 678 आरोपींना अटक करण्यात आली आहे.