महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पारंपारिक व्यवसायाला फाटा देत वडार समाजातील तरुण साकारतोय आकर्षक चित्र - भगवान गायकवाड तिसरी शिकलेला तरुण पेंटर

चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील भगवान गायकवाड हा भटक्या विमुक्त समाजातील तरुण आपल्या पारंपारिक असलेल्या, दगड फोडण्याचे काम करत होते. मात्र त्याला सुरुवातीपासूनच चित्रकला क्षेत्राची मोठी आवड होती. याच क्षेत्रात शिक्षण घेण्याची त्याची इच्छा ही होती. परंतु परिस्थिती अभावी त्याला तिसरीपर्यंत शिक्षण घेता आले. मात्र हताश न होता या तरुणाने विविध वृत्तपत्रातील अक्षरांचे फॉन्ट समजून घेत, लिहायला सुरुवात केली.

भगवान गायकवाड
भगवान गायकवाड

By

Published : Feb 9, 2022, 8:08 PM IST

Updated : Feb 9, 2022, 8:27 PM IST

मुंबई -आजही बरेचसे तरुण आपल्या परिस्थितीला दोष देत, आपल्या पारंपारिक व्यवसायातच गुंतून पडत असल्याची परिस्थिती बऱ्याचदा पाहायला मिळते. मात्र जिद्द, चिकाटी, आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण उत्कृष्टपणे काम करू शकतो. याचाच प्रत्यय बुलडाण्यात पाहायला मिळाले आहे.

वडार समाजातील तरुण साकारतोय आकर्षक चित्र

चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील भगवान गायकवाड हा भटक्या विमुक्त समाजातील तरुण आपल्या पारंपारिक असलेल्या, दगड फोडण्याचे काम करत होते. मात्र त्याला सुरुवातीपासूनच चित्रकला क्षेत्राची मोठी आवड होती. याच क्षेत्रात शिक्षण घेण्याची त्याची इच्छा ही होती. परंतु परिस्थिती अभावी त्याला तिसरीपर्यंत शिक्षण घेता आले. मात्र हताश न होता या तरुणाने विविध वृत्तपत्रातील अक्षरांचे फॉन्ट समजून घेत, लिहायला सुरुवात केली. त्याचबरोबर एखाद्या चित्रकलेची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणे नैसर्गिक, विविध व्यक्तींचे, देवी-देवतांचे तो उत्कृष्टपणे चित्र रेखाटतो. आता या क्षेत्रात तो पूर्णपणे पारंगत झाला आहे. त्याने आपला पारंपारिक व्यवसाय बंद केला आहे. छन्नी - हातोड्याने दगड घडवणारे हात आता सुबक अक्षर घडवत आहेत. या तरुणाने मुंबई चित्रपट सृष्टीमध्ये पेंटिंग, देखावे असे विविध कार्य केलेले आहे. सध्या तो पुणे येथे आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करत आहे. त्याच्याच आधारावर तो आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत आहे. नुकतीच या तरूणाने बुलडाण्यात आपली एक कला प्रकट केली आहे. बुलडाणा येथील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांच्या परसबागेत या तरुणाने आपल्या कला कौशल्याची अनुभूती दिली आहे. त्यामुळे शिकण्याची आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास कुठलीच गोष्ट अशक्य नाही. हे या तिसरा वर्ग शिकलेल्या तरुणाकडून शिकायला मिळत आहे.

हेही वाचा -Trapped Kerala Trekker Rescued : केरळच्या ट्रेकरची सुटका, 45 तासानंतर भारतीय लष्कराने वाचवलं, पाहा थरारक Video

Last Updated : Feb 9, 2022, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details