मुंबई - काहीतरी अजबच! कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील तरच दारू मिळेल असा नियम करण्यात आलाय. हा नियम तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यात करण्यात आला आहे. आता दारू पेयची असेल तर लसीकरण करावे लागेल. नागरिकांमध्ये लस घेण्याबाबत अनास्था आहे. मात्र, दारू पिण्याबाबत कसलीच अनास्था नाही. त्यामुळे काही नागरिक दारू पिण्यासाठी जसे तयारच असतात तसे ते लस घेण्यासाठीही व्हावेत यासाठी हा अनोखा प्रयोग येथे करण्यात आला आहे. हा निर्यण येथील जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
दोन्ही लस घेतल्या असतील तरच मिळेल दारु, या जिल्ह्याधिकाऱ्यांनी घेतला निर्णय - you need to take both doses of the vaccine
काहीतरी अजबच! कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील तरच दारू मिळेल असा नियम करण्यात आलाय. हा नियम तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यात करण्यात आला आहे. नागरिकांमध्ये लस घेण्याबाबत अनास्था आहे. मात्र, दारू पिण्याबाबत कसलीच अनास्था नाही. लोक म्हणतात दारू घेतल्यामुळे लसीकरण करता येत नाही. त्यामुळे आता दारू खरेदी करण्यासाठी त्यांना लसीकरणाचा पुरावा दाखवावा लागणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जे. निष्पाप दिव्या यांनी दिली आहे.
दारू खरेदी करण्यासाठी दोन्ही डोस घेतल्याचा पुरावा दाखवावा लागणार
याबाबत बोलताना जिल्हाधिकारी जे. निष्पाप दिव्याने सांगितले की, लोक म्हणतात दारू घेतल्यामुळे लसीकरण करता येत नाही. त्यामुळे आता दारू खरेदी करण्यासाठी त्यांना लसीकरणाचा पुरावा दाखवावा लागणार आहे. तसा नियम आम्ही केला असल्याची माहिती दिव्या यांनी यावेळी दिली आहे. आज लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. मात्र, आणखीही खूप असे लोक आहेत जे लसीकरण करून घेण्यासाठी सहजासहजी तयार होत नाहीत. त्यामुळे कोणत्याना कोणत्या मार्गाने लोकांना लसीकरणाकडे वळवण्याचे मार्ग प्रशासनाकडून अवलंबले जात आहेत.