महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 23, 2019, 7:37 PM IST

ETV Bharat / city

मतमोजणीला काही तास बाकी, ईव्हीएममध्ये घोटाळे झाले नाही तर नक्कीच चांगला रिझल्ट लागेल - राजुल पटेल

राज्यातील विधानसभा निवडणुकीती मतमोजमी २४ तारखेला होत आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा झाला नाही तर नक्की चांगले रिझल्ट लागतील, अशी प्रतीक्रीया राजुल पटेल यांनी दिली.

ईव्हीएममध्ये घोटाळे झाले नाही तर रिझल्ट चांगला लागेल - राजुल पटेल

मुंबई - राज्यातील विधानसभा निकडणुकीची मतमोजणी गुरुवारी (24 ऑक्टोबरला) होत आहे. मतमोजणीला काही तास उरले असताना उमेदवारांच्या मनातील धाकधूक वाढली आहे. ईव्हीएममध्ये घोटाळे झाले नाही, तर नक्कीच चांगले रिझल्ट लागतील. असा विश्वास शिवसेनेच्या नगरसेविका व वर्सोवा मतदार संघातील अपक्ष उमेदवार राजुल पटेल यांनी व्यक्त केला आहे. तर माझ्या मनात कसलीही धाकधूक नसून मी नक्कीच निवडून येईल असा विश्वास महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान झाले. मुंबई शहर विभागात मतदानाचा टक्का घसरला आहे. उपनगर जिल्ह्यात मात्र मतदानाची टक्केवारी वाढली आहे. निवडणुकीसाठी २४ ऑक्टोबरला मतमोजणी होत आहे. मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. मतमोजणीला काही तास उरले असतानाच उमेदवारांच्या मनात धाकधूक वाढली आहे. याबाबत बोलताना मतमोजणीबाबत कोणत्याही प्रकारची धाकधूक नाही. मतदारांचा कौल महत्वाचा ठरेल. मला पूर्ण खात्री आहे वांद्रे पूर्व मतदारसंघातील मतदार शिवसेना, भाजपा, आरपीआय, रासपाचा उमेदवार म्हणून मतदार माझ्या पाठीशी आहेत. यामुळे विजय महायुतीच्या उमेदवाराचा नक्की आहे. असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटले आहे.

मतमोजणीचा कौल ज्या बाजूने असेल त्याबाजूने निकाल लागला पाहिजे हि माझी अपेक्षा आहे. ईव्हीएमचे घोटाळे नाही झाले तर नक्कीच चांगला निकाल लागेल. मतमोजणीबाबत नक्कीच धाकधूक आहे. आज एवढी मेहनत केली आहे. लोकांनी मतदान केले आहे. जितक्या मतदारांनी मत दिले आहे. त्या ठिकाणचे मतदार तुम्हालाच मतदान केले आहे असे सांगत आहेत. मतमोजणी होईल तेव्हाच नक्की काय ते कळेल. मला विश्वास आहे शिवसेना भाजपाला लोकांनी सहकार्य केले आहे. त्यामुळे शिवसेना भाजपाची सत्ता येईल. वर्सोवा मतदार संघात माझा विजय हा निश्चित आहे. मला सर्वसामान्य नागरिकांनी निवडणुकीसाठी उभे केले होते. जनताच मला निवडणून देतील असे राजुल पटेल यांनी म्हटले आहे.

गेले 20 ते 25 दिवस आम्ही चांगला प्रचार केला. नागरिकांनीही आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. लोकांनी आम्हाला प्रेम दिले. यामुळे मी जिंकून येईल असा विश्वास वांद्रे पश्चिम येथील काँग्रेसचे उमेदवार व नगरसेवक आसिफ झकेरीया यांनी व्यक्त केला. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. विरोधी उमेदवार ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होते. मात्र गेल्या पाच दिवसापासून त्यांच्यात फरक जाणवत असल्याचा टोला काँग्रेसचे वांद्रे पश्चिम येथील उमेदवार व नगरसेवक आसिफ झकेरीया यांनी लगावला.

ईव्हीएममध्ये घोटाळे झाले नाही तर रिझल्ट चांगला लागेल - राजुल पटेल

निवडणूक चुरशीची -

राजुल पटेल या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. त्यांनी शिवसेना भाजपा आरपीआय रासपा महायुतीच्या भरती लव्हेकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. वांद्रे पूर्व येथील आमदार तृप्ती सावंत यांना बाजूला करत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे तृप्ती सावंत यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करत निवडणूक लढवली आहे. वांद्रे पश्चिम मतदार संघातून भाजपाचे माजी मुंबई अध्यक्ष व शिक्षण मंत्री असलेल्या आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरिया हे निवडणूक लढवत आहेत. यामुळे या मतदार संघामधील निवडणूक चुरशीची झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details