मुंबई - राज्यात होणाऱ्या लसीकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि पालिका प्रशासनावर टीका केली आहे. खासगी रुग्णालयात देण्यासाठी लस आहे पण महापालिकेला देण्यासाठी का नाही, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला केला आहे.
ग्लोबल टेंडरच काय झालं ?
लसीकरणाबाबत रोज इतके नियम बदलले गेले की, आता मूळ काय नियम होते ते आरोग्य मंत्र्यांना ही आठवणार नाहीत. आता ज्या लसींना मान्यता नाही त्याच्यासाठी तुम्ही ग्लोबल टेंडर काढता. त्याला कोणी प्रतिसाद दिला नाही, त्यात नियोजन नाही. लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना गरज नाही की त्यांनी तुमच्याकडे यावे. तर आता तुम्हाला गरज आहे की आता तुम्ही कंपन्यांकडे जा. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ३ महिन्यात लसीकरण करण्याबाबत बोलले होते, त्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार याच्या सगळ्यांनी बातम्या केल्या. पण त्या टेंडरचे काय झाले. ते फुस्स झाले, अशी टीका देशपांडे यांनी सेनेवर केली आहे.
खासगी रुग्णालयात देण्यासाठी लस आहे, मग महापालिकेला देण्यासाठी का नाही ? मनसेचा सवाल - मनसेची राज्य सरकारवर टीका
राज्यात होणाऱ्या लसीकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि पालिका प्रशासनावर टीका केली आहे. खासगी रुग्णालयात देण्यासाठी लस आहे पण महापालिकेला देण्यासाठी का नाही, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला केला आहे.
आम्हाला सांगतात राजकारण करू नका, हे राजकारण करतात ते चालते का ? प्रत्येक लसीकरण केंद्राबाहेर शिवसेनेचे फलक का लावण्यात आले आहेत. लस काय मातोश्री, वर्षा किंवा अनिल परब यांच्या घरी बनते का ? यांचे फोटो कशाला असतात. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना राजकारण करणार आणि आम्हाला सांगणार राजकारण करू नका. मुख्यमंत्र्यांनी एकदा सेनेच्या लोकांसाठी फेसबुक लाईव्ह करावे आणि त्यांना सांगावे की राजकरण करू नये. रोज एक नवीन केंद्र लसीकरणाशाठी उघडते, ते काय राजकारण नाही का, असेही देशपांडे यांनी सांगितले.
लसीतही पैसे कमवायचे आहेत का?
खासगी रुग्णालयात देण्यासाठी लस आहे पण महापालिकेला देण्यासाठी का नाही याच कारण काय सरकारने उत्तर द्यावे ? या काळत वाट्टेल तसे कॉन्ट्रॅक्ट दिले जात आहे. लसींच्या वेगवेगळ्या किमती आहेत. कारण त्याला कुठलेच कॉपिंग नाही. मग गरीब सर्वसामान्यांचे लसीकरण कसे होणार. यांना लसीतही पैसे कमवायचे आहेत का? म्हणून टेंडर काढत आहात का? ज्या लसींना मान्यता नाही त्याच्यासाठी तुम्ही टेंडर काढता. असा सवालही देशपांडे यांनी विचारला आहे.