महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Tipu Sultan name Controversy : मैदानाला टिपू सुलतान नाव दिले तर भाजप राज्यभर आंदोलन करेल -चंद्रकांत पाटील

मैदनाला नाव देण्याचा चालू असतानाच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. (ground name Tipu Sultan) दरम्यान, जर मैदानाला टिपू सुलतान नाव दिले तर भाजप राज्यभर आंदोलन करेल असा इशाराही दिला आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

By

Published : Jan 27, 2022, 12:06 AM IST

मुंबई - मुंबईत एका मैदनाला नाव देण्याचा चालू असलेल्या आंदोलनावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. (Dispute in BJP-government over Tipu Sultan's name) दरम्यान, जर मैदानाला टिपू सुलतान नाव दिले तर भाजप राज्यभर आंदोलन करेल असे सांगतच आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे देखील त्यांनी पुण्यात बोलताना सांगितले आहे.

व्हिडिओ

मैदनाला टिपू सुलतान नाव देणे चुकीचे

त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी या साऱ्या प्रकरणावर मी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, या मैदानाला नाव देण्यावरून सरकार दडपशाही करत आहे असाही आरोप केला आहे. (Tipu Sultan name Controversy) जर हे नाव देणार आसालत हे मुळातच खपवून घेतल जाणार नाही. (Tipu Sultan's name) हे आंदोलनाचे लोण राज्यभर पसरेल असही पाटील म्हणाले आहेत. तसेच, मी धमकी देत नाही असे सांगत त्यांनी मैदानाला टिपू सुलतान हे नाव देणे चुकीचे असल्याचे सांगीतले आहे. आम्हाला हे मान्य नाही. यावेळी राज्यभर आंदोलन करेल असा इशारा देखील त्यांनी यावेळी बोलाताना दिला आहे.

मुंबईत भाजपचाच महापौर

आगामी मुंबई महानगरपालिकेत भाजीपाला 117 जागा मिळतील आणि यावेळी मुंबईचा महापौर हा भाजपच असेल अस देखील चंद्रकांत पाटील यावेळी बोलताना म्हणाले आहेत. त्याचबरोबर मागच्या वेळेसच मुंबईत भाजपचा महापौर झाला असता, पण केवळ अमित शहा यांनी शिवसेनेला संधी द्या असे सांगितले आणि मुंबईत सेनेचा महापौर झाला. मात्र, यावेळी असे होणार नाही. असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत बुधवारी १८५८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, १३ जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details