महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kirit Somaiya : सात दिवसांत गुन्हा दाखल झाला नाही तर तक्रार करणार -सोमैया - किरीट सोमय्या यांचा महाविकास आघाडीवर आरोप

कोविड सेंटर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आज त्यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन जाऊन याबाबत सात दिवसाच्या आत तक्रार दाखल करावी अशी मागणी केली. अन्यथा, दंडाधिकारी न्यायालयात पोलिसांविरोधात आपण तक्रार दाखल करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या

By

Published : Feb 15, 2022, 1:13 PM IST

मुंबई -कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी आज आझाद मैदान पोलीस स्टेशनला जाऊन याबाबत सात दिवसांच्या आत तक्रार दाखल करावी अशी मागणी केली आहे. (Corruption in Kovid Center On Somaiya) याबाबत कोणतीही तक्रार दाखल केली गेली नाही. तर, आपण पोलीस स्टेशन शेजारीच असलेल्या दंडाधिकारी न्यायालयात पोलिसांविरोधात तक्रार दाखल करू असा इशाराही सोमैया यांनी दिला आहे.

13 कॉन्ट्रॅक्ट कोविड सेंटर उभारण्याचे कंत्राट

संजय राऊत यांचे पार्टनर असलेले सुजित पाटकर याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार केला. याबाबतचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला आहे. तसेच पुणे महानगरपालिकेने ब्लॅक लिस्ट केलेल्या कंपन्यांना 13 कॉन्ट्रॅक्ट कोविड सेंटर उभारण्याचे कंत्राट कसे देण्यात आले. त्यामुळे सुजित पाटकर यांच्यावर कारवाई होईल का? असा सवाल किरीट सोमैया यांनी उपस्थित केला.

मुळ मुद्द्यापासून लक्ष हटवण्यासाठी शिवसेनेचे पत्रकार परिषद

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात आपल्याकडे पुरावे असून ते आज 4वाजता च्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत आपण सादर करू असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मात्र राज्यात असलेल्या मूळ मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी संजय राऊत आणि शिवसेना ही पत्रकार परिषद घेत आहे. तसेच संजय राऊत यांच्याकडूनच नौटंकी सुरू असल्याचा टोलाही यावेळी किरीट सोमैया यांनी लगावला आहे. तसेच आज केंद्रीय तपास यंत्रणांकडून मुंबई ठेवणारे कारवाई ही दहशतवादाच्या विरोधात आहे. फॉरेन फंडिंग झाल्यामुळेच ह्या सर्व चौकशी सुरु असल्याचं किरीट सोमैया यावेळी म्हणाले.

हेही वाचा -Shiv Sena Press Conference : 'सौ सुनार की एक लोहार की', राऊतांनी सोडला बाण; आज पत्रकार परिषद

ABOUT THE AUTHOR

...view details