महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विना डिग्री कोणी डॉक्टर बनत असेल तर, अशी डॉक्टरांविरुद्ध कारवाई करा -नवाब मलिक - नवाब मलिक यांची रामदेव बाबा यांच्यावर टीका

रामदेवबाबा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर नवाब मलिक यांच्याकडून त्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. रामदेवबाबा यांच्याकडे आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री असेल तरच ते लोकांना सल्ला देवू शकतात. मात्र केवळ आपले व्यवसाय चालवण्यासाठी रामदेवबाबा असे वक्तव्य करत असल्याचे यावेळी नवाब मलिक म्हणाले.

Nawab Malik
Nawab Malik

By

Published : Jun 2, 2021, 3:14 PM IST

मुंबई - ज्या व्यक्तीने कुठल्याही मेडिकल कौन्सिलकडून कुठलीही डिग्री घेतलेली नाही. ती व्यक्ती उपचाराचा सल्ला देऊ शकत नाही. विना डिग्रीचं कोणी डॉक्टर होऊ पाहत असेल तर, अशा डॉक्टरवर कारवाई करा, अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. रामदेवबाबा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर नवाब मलिक यांच्याकडून त्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.


रामदेवबाबा यांच्याकडे आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री असेल तरच ते लोकांना सल्ला देवू शकतात. मात्र केवळ आपले व्यवसाय चालवण्यासाठी रामदेवबाबा असे वक्तव्य करत असल्याचे यावेळी नवाब मलिक म्हणाले.

केंद्रीय आरोग्य विभागाने रामदेवबाबा यांचे विधान गंभीरतेने घेण्याची गरज आहे. देशात अॅलोपॅथी, आयुर्वेद, युनानी मेडिसीन, होमिओपॅथी या सर्व मेडिसिनना मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासाठी वेगवेगळे मेडिकल कौन्सिल बनवण्यात आले आहेत. वैज्ञानिक पध्दतीने जी थेरपी आहे तिला मान्यता आहे. त्यानुसार उपचार करण्याची व्यवस्था बनवण्यात आल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

रामदेवबाबा हे डॉक्टर नाहीत. कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री घेतलेली नाही. परंतु उपचार करण्यावरुन ते सतत काही विधाने करत आहेत. अलोपॅथीवर वक्तव्य करत आहेत. आयुर्वेदावरुन उपचाराचे सल्ले देत आहेत. देशाच्या संविधानात वैज्ञानिक पद्धतीने संपूर्ण देशाचे कामकाज चालते. अविश्वास, अंधविश्वासाचा प्रचार कोण करत असेल तर ते देशाला घातक आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. दरम्यान रामदेव बाबा यांच्या उत्पादनाचे उद्घाटन करण्यासाठी देशाचे आरोग्य मंत्री जातात त्यापेक्षा दुर्दैवी घटना असू शकत नाही अशा शब्दात नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details