मुंबई - पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधक आणि सातत्याने घोषणाबाजी करत असताना आपल्याला गद्दार म्हंटले असल्याची खंत विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणादरम्यान बोलून दाखवली. मात्र, पाठीत खंजीर खुपसणार्यांची गद्दार नाही तर काय म्हणायचे. राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार हे गरिबांसाठी काम करत होते. Aditya Thackeray criticizes rebel MLAs मात्र, गद्दारी करून हे सरकार पाडण्यात आले. गद्दारांसाठी डिक्शनरीमध्ये इतर कोणता शब्द आहे का. असा प्रश्न आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला. मातोश्री आणि ठाकरे कुटुंबावर काही नाही म्हणणार असे म्हणणारे आमदार आज पोस्टर लावून उभे आहेत. अशी केविलवाणी अवस्था आमदारांची झाली आहे. केवळ घाणेरडे राजकारण सुरू असून हे राजकारण खालच्या पातळीवर गेली असल्याची खंतही आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
अधिवेशनात केवळ आश्वासनेराज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. विरोधक म्हणून पावसाळी अधिवेशनात हे सर्व प्रश्न आम्ही साधारण समोर मांडले. राज्यातला शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाला आहे. आदिवासी समाजाचे प्रश्न प्रलंबित आहेत. अधिवेशनाचा पहिलाच प्रश्न आरोग्य खात्याबाबत विचारण्यात आला होता, त्याचे उत्तर ही राज्य सरकारला देता आले नाही. असा कारभार राज्यसरकारचा सुरू आहे. अनेक घोषणा राज्य सरकारने केल्यात मात्र त्यात केवळ कागदावर अतीत आहेत.