महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नेटफिलक्सने वेब सिरीज बनवली तर अजित पवारांना मिळतील कोटी रुपये -किरीट सोमैया - etv Bharat marathi

अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर असलेली भारतातील ही आयकर विभागाची सगळ्यात मोठी धाड आहे. यावर नेटफिलक्सने वेब सिरीज बनवली, तर अजित पवारांना कमीत कमी 200 ते 300 कोटी रॉयल्टी मिळू शकते अशी मिश्किल टीका भाजप नेते किरीट सोमैया यांनी केली आहे. ते पत्रकार परिषद बोलत होते.

पत्रकार परिषद
पत्रकार परिषद

By

Published : Oct 14, 2021, 8:43 AM IST

पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर असलेली भारतातील ही आयकर विभागाची सगळ्यात मोठी धाड आहे. यावर नेटफिलक्सने वेब सिरीज बनवली, तर अजित पवारांना कमीत कमी 200 ते 300 कोटी रॉयल्टी मिळू शकते अशी मिश्किल टीका भाजप नेते किरीट सोमैया यांनी केली आहे. ते पत्रकार परिषद बोलत होते. या पत्रकार परिषदेला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, उपमहापौर सुनीता वाडेकर, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक गणेश घोष, भाजपचे प्रवक्ते संदीप खडेकर व पदाधिकारी उपस्थित होते.

'मोहन पाटील जरंडेश्वर साखर कारखान्याचे संचालक आहेत'

सोमैया म्हणाले, जरंडेश्वरमध्ये अजित पवार आणि त्यांच्या बहिण मालक, भागधारक आहेत. बहिणींच्या नावे अजित पवारांनी बेनामी संपत्ती जमवली आहे. आयकर विभागाचे छापेमारी त्याच संदर्भात सुरु असून अजित पवारांनीच आता सांगावे की, बहिणींच्या घरी धाडी का टाकण्यात आल्या आहेत. अजित पवारांच्या बहिणीचे पती मोहन पाटील जरंडेश्वर साखर कारखान्याचे संचालक आहेत. पवार कुटुंबीयांच्या अनेक बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी यावेळी केला आहे.

'अजित पवारांनी स्वतःच कारखान्याची विक्री केली'

सोमया यांनी पवार यांच्या घोटाळ्याची माहिती दिली आहे. सोमय्यांनी म्हटले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट म्हटले आहे की, जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी विक्रीमध्ये घोटाळा झाला आहे. याची चौकशी झाली पाहिजे असे निर्देश महाराष्ट्र पोलीस आणि ईडीला दिली. अजित पवारांनी जरंडेश्वर कारखाना घेतला तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सर्वेसर्वा होते. या तीन आणि राज्य सरकारचे पैसेही त्यात घालण्यात आले. अजित पवारांनी स्वतःच कारखान्याची विक्री केली आणि लिलाव करुन स्वतःच विकत घेतला अशा प्रकारे उल्लंघन केले. नियमांचे उल्लंघन करुन त्यांनी स्वतःच बेनामी पद्धतीने कारखाना घेतला त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपदी राहता येणार नाही असा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे.

'ही सर्व मंडळी अजित पवारांच्या बहिणी आहेत'

पवारांनी आयकर विभागाच्या छापेमारीवर प्रतिक्रिया दिली होती की, माझ्या बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. हे भाजप आणि केंद्र सरकारचे हीन दर्जाचे राजकारण आहे. परंतु, अजित पवार जरंडेश्वर साखर कारखान्याचे मालक आहेत. जरंडेश्वरमधील भागधारकांमध्ये पहिले नाव मोहन पाटील आहे. ते विजया पाटील यांचे पती आहेत. निता पाटील यांचे नाव आहे. ही सर्व मंडळी अजित पवारांच्या बहिणी आहेत. तसेच मोहन पाटील हे बहिणीचे पती आहेत. अजित पवारांनी आता स्वतःच सांगावे की बहिणींच्या घरी धडी का टाकल्या? यामागील खरं खोटं पवारांनी सांगावं असही सोमैया म्हणाले आहेत.

'अजित पवारांची बहिणीच्या नावे बेनामी संपत्ती आहे'

अजित पवारांच्या बहिणींचा संबंध नाही तर त्यांच्या घरी छापेमारी करण्यात का आली हे जनतेला अजित पवारांनी सांगावे असे सोमय्यांनी म्हटलं आहे. बहिणींचा संबंध नाही म्हणतात परंतु त्यांच्या बहिणी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या मालक आहेत. भागधारक आहेत. अजित पवारांची बहिणीच्या नावे बेनामी संपत्ती आहे. विजया पाटील, मोहन पाटील आणि निता पाटील यांच्या नावे अनेक बेनामी कंपन्या असून यांची मूळ कंपनी कल्पक वृक्ष प्रा. लि या कंपनीचाही संबंध आहे

'कंपनीचे मालक संचालक या सुनेत्रा पवार आणि अजित अनंतरराव पवार आहेत'

राज्यातील ठाकरे -पवार सरकार हे घोटाळेबाज सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पत्नीच्या नावे १९ बंगल्यांची संपत्ती उभी करु शकतात तर पवार काहीही करु शकतात असे सोमेया यांनी म्हटले आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यामध्ये ९०.५ टक्के शेअर आहेत. एकूण २७ जणांचा लेअर करण्यात आला आहे. ९०.५ टक्के शेअर हे स्पार्कलिंग सॉईल कंपनीचे आहेत. या कंपनीचे मालक संचालक या सुनेत्रा पवार आणि अजित अनंतरराव पवार आहेत. याला म्हणतात परिवार असा घणाघात किरीट सोमैया यांनी केला आहे.

हेही वाचा -Drugs cruise case: आर्यन खानच्या आजचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगातच, जामिनावर उद्या सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details