मुंबई - कोरोना काळात राज्यात ज्या वीज ग्राहकांना विजेचे अधिकची बिले आली आहेत, ती वीज बिले सरकारने माफ करावीत, अशी आमची मागणी आहे. परंतु ही वीज बिले माफ केली नाही तर सरकारविरोधात आमचा संघर्ष अटळ आहे, असा गंभीर इशारा शेतकरी नेते हे राजू शेट्टी यांनी दिला आहे
..अन्यथा सरकारविरोधात संघर्ष अटळ, राजू शेट्टी यांचा इशारा - राजू शेटींचा सरकारला इशारा
कोरोना काळात राज्यात ज्या वीज ग्राहकांना विजेचे अधिकची बिले आली आहेत, ती वीज बिले सरकारने माफ करावीत अन्यथा सरकारविरोधात आमचा संघर्ष अटळ आहे, असा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते हे राजू शेट्टी यांनी दिला आहे
कोरोनाच्या काळातील सर्व साधारण वीजग्राहक, शेती पंप वीज ग्राहक आदींना देण्यात आलेली वीज बिले माफ करावीत तसेच शेतीसाठी पुरवण्यात येत असलेल्या उच्च दाब व कमी दाबाच्या संदर्भात आकारण्यात येणाऱ्या वीज दरातील तफावत दूर केली जावी, आदी मागण्यांसाठी शेट्टी यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी कोरोना काळात सुरुवातीला तीन महिन्यांत ज्या ग्राहकांना वीज बिले आलेली आहेत ती माफ केली जावीत, अन्यथा आमचा सरकार विरोधातील संघर्ष अटळ असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या वीज बिलाची थकबाकी, व्याजाची आकारणी कमी करावी, मुद्दल कमी करून द्यावे आम्ही ते भरू असे आपण यावेळी ऊर्जा मंत्र्यांना सांगितले. तर आपल्यासमोर राज्यातील घरगुती ग्राहकांच्या वीज बिलासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच निर्णय घेऊ शकतात, मात्र यापुढे वीज ग्राहकांनी वीज बिले भरली नाहीत तर ती तोडली जातील, असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. यामुळे 5 कोटी ग्राहकांच्या हक्कासाठी आपण सरकार विरोधात रस्त्यावर उतरून दोन हात करू, असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला.