महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

...तर मुंबईत लॉकडाऊनची वेळ येणार नाही - मुंबई महापालिका - सुरेश काकाणी बातमी

नागरिकांनी मास्क वापरा, हात वारंवार धुवा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा या त्रिसूत्रीची पालन करून साथ दिली तर मुंबईवर लॉकडाऊनची वेळ येणार नाही, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

bmc
मुंबई महापालिका

By

Published : Mar 4, 2021, 8:19 PM IST

Updated : Mar 4, 2021, 8:30 PM IST

मुंबई -मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी नागरिकांनी मास्क वापरा, हात वारंवार धुवा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा या त्रिसूत्रीची पालन करून साथ दिली तर मुंबईवर लॉकडाऊनची वेळ येणार नाही, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. तसेच लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने आधी नोंदणी करावी नंतर लसीकरण केंद्रावर यावे असे आवाहन काकाणी यांनी केले आहे.

सुरेश काकाणी - अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

लॉकडाऊनची वेळ येणार नाही -

मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरु झाला. करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या आठवडाभरात चार दिवस रुग्णसंख्या हजाराच्या वर गेली होती. दोन दिवस हि रुग्णसंख्या आठशेच्या घरात होती. तर काल त्यात पुन्हा वाढ झाली. काल ११२१ नवे रुग्ण आढळून आले. त्या पार्श्वभूमीवर काकाणी बोलत होते. यावेळी बोलताना मुंबईत एम वेस्ट, आर साऊथ, आर सेंट्रल, के वेस्ट, एच वेस्ट वॉर्डची पाहणी केली आहे. मुंबईत ९७ ते ९८ टक्के रुग्ण हे ईमारतीत राहणारे आहेत. तर केवळ २ ते ३ टक्के लोक हे दाटीवाटीच्या वस्तीत राहणारे आहेत. सध्या लॉकडाऊनची वेळ आपल्यावर येईल असा वाटत नाही असे काकाणी म्हणाले.

हेही वाचा -जळगाव वसतिगृह प्रकरणातील तक्रारदार महिला वेडसर; गृहमंत्र्यांची माहिती

आधी नोंदणी नंतर लसीकरण -

मुंबईतील लसीकरण केंद्रावर गर्दी होत असल्याबाबत बोलताना, मुंबईत २९ खाजगी रुग्णालयाला केंद्र शासनाने लसिकरणासाठी परवानगी दिली आहे. आज २३ महापालिका आणि १६ खाजगी रुग्णालयात कोरोनाचे लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. लसीकरणाचा गोंधळ होऊ नये म्हणून मोफत आणि मोबदला घेवून लसीकरण करणारी रुग्णालये वेगवेगळी केली आहेत.

नागरिकांनी आधी नोंदणी करावी आणि नंतर केंद्रावर जाऊन लस घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. खासगी रुग्णालयांना पालिकाच लसीकरणाचे स्लॉट ठरवून देणार आहे. खासगी रुग्णालयातील आरोग्यसेवकांना पालिका लस देईल, खासगी रुग्णालयांनी नागरिकांना लसीकरण सुरू करावे.

या देशातून येणाऱ्यांना करणार क्वारंटाईन-

कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळून आल्याने युरोपियन, आखाती देशांतून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी आणि क्वारंटाईन बंधनकारक केली होते. आता दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील मधून येणाऱ्या प्रवाशांना लोकांना कोरंटाईन केले जाईल. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह असली तरी ७ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन व्हावे लागेल आणि त्यानंतर ही ७ दिवस घरी क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

हेही वाचा -सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांविरोधात दिला हक्कभंग प्रस्ताव

Last Updated : Mar 4, 2021, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details