मुंबई -आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावे, हे शिवसैनिकांचे स्वप्न आहे. यामध्ये काहीही गैर नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील काही गैर वाटणार नाही, असे उध्दव ठाकरे म्हणाले. भाजपकडून शिवसेनेला लहान भाऊ म्हणून संबोधले जाते. मात्र, आता लहान-मोठा असा प्रश्न सुटला आहे. भावाचे नाते महत्त्वाचे आहे. आम्ही भाऊ म्हणून एकत्र आलो आहोत, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लहान-मोठा या वादावर पडदा टाकला.
जागा वाटपाच्या आकड्यावर सर्वकाही अवलंबून नसते. सर्व गोष्टी सोबत बसून ठरवता येतात, असे स्पष्टीकरण ठाकरे यांनी शिवसेनेला मिळालेल्या जागा वाटपावर दिले. लोकसभा निवडणुकीवेळी असलेले वातावरण आता महाराष्ट्रात राहिले नाही. आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा व महाराष्ट्रातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्व एकत्र आलो आहोत.