मुंबई -कोरोनाचा परिणाम सणासुदीवर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलਾ आहे. या वर्षी देखील वर्गणी जमा करण्यात येणार नसल्याने मंडळांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर अंधेरीतील 285 मंडळांना जीवन ज्योत प्रतिष्ठानच्या माध्यमातून गणपतीची मूर्ती वा पूजेचे साहित्य दिली जाणार आहे.
कोरोनाचे संक्रमण कमी असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. यामुळे सर्व उत्सव व सणांवर शासनाने निर्बध घातले आहेत. गणेशोत्सवावर मर्यादा आल्या आहेत.
सार्वजनिक मंडळांचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार, 'जीवन ज्योत' देणार 285 मूर्ती
अंधेरितील गणेशोत्सव मंडळांना मदत म्हणून आमच्या माध्यमातून गणपतीची मूर्ती आणि 11 दिवस पूजेचे साहित्य दिली जाणार आहे. 1 ते 4 फुटाच्या गणपती मूर्तीची किंमत 4 हजार ते 18 हजारापर्यंत आहे. ह्या मूर्ती अंधेरीतीलच मूर्तीकारांकडून तयार करून घेऊन जीवन ज्योत ही संस्था अंधेरी पूर्वेतील ज्या मंडळांनी नोंदणी केली आहे, अश्या सार्वजनिक मंडळांना मदतीचा हात म्हणून गणेशाची मूर्ती मोफत देत आहेत.
गणेश मूर्तींसाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
मुंबईतील गणेशोत्सव मंडळ हे वेगवेगळ्या सजावटीतून छाप पाडत असतात. मात्र यंदादेखील याचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. मंडळासमोर असणारा आर्थिक प्रश्न कायम आहे. राज्यसरकारनेही जाहिराती घेण्यास मनाई केलेली आहे. म्हणूनच अंधेरीतील जीवन ज्योत प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. अडीचशेपेक्षा जास्त गणेशमूर्तींचे वाटप ते मंडळांना करणार आहेत. गणेश मूर्ती मिळवण्यासाठी मंडळानी नाव नोंदणी करा, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
आतापर्यंत 180 मंडळांची नोदणी
गणेशोत्सव अवघ्या एक महिन्यात सुरू होत आहे. गेल्या वर्षीपासून कोरोना महामारी असल्याने सर्वच सण उत्सवावर निर्बंध आले. लॉकडाऊनमुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक सामाजिक संस्थेने मदतीचा हात पुढे केलेत. अशाच प्रकारे आमची जीवन ज्योत संस्था मदत करत आहे. कोरोनामुळे राज्यात 2 वेळा लॉकडाउन केल्यामुळे यावर्षी गणपती मंडळाला वर्गणी जमा करण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे. अंधेरितील गणेशोत्सव मंडळांना मदत म्हणून आमच्या माध्यमातून गणपतीची मूर्ती आणि 11 दिवस पूजेचे साहित्य दिली जाणार आहे. 1 ते 4 फुटाच्या गणपती मूर्तीची किंमत 4 हजार ते 18 हजारापर्यंत आहे. ह्या मूर्ती अंधेरीतीलच मूर्तीकारांकडून तयार करून घेऊन जीवन ज्योत ही संस्था अंधेरी पूर्वेतील ज्या मंडळांनी नोंदणी केली आहे, अश्या सार्वजनिक मंडळांना मदतीचा हात म्हणून गणेशाची मूर्ती मोफत देत आहेत. आता पर्यंत 180 मंडळांनी नोदणी केली. अश्या प्रकारे मंडळांना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जीवनज्योत संस्था जपत आहे, असे प्रतिष्ठानचे संस्थापक मुरजी पटेल यांनी सांगितले.