महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात आयडॉलच्या परीक्षा; पहिल्यांदाच होणार ऑनलाइन

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) आपल्या उन्हाळी सत्राच्या पदवी आणि पदव्युत्तर अशा विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक आज जाहीर केले आहे. त्यानुसार आयडॉलमधील पदवी स्तरावरील अंतिम वर्षाच्या परीक्षा 3 ऑक्टोबरपासून तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा 8 ऑक्‍टोबरपासून घेण्यात येणार आहेत.

semister exams of mumbai university
ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात आयडॉलच्या परीक्षा; पहिल्यांदाच होणार ऑनलाइन

By

Published : Sep 14, 2020, 7:48 AM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) आपल्या उन्हाळी सत्राच्या पदवी आणि पदव्युत्तर अशा विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक आज जाहीर केले आहे. त्यानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून अंतिम वर्षाच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.

आयडॉलमधील पदवी स्तरावरील अंतिम वर्षाच्या परीक्षा 3 ऑक्टोबरपासून तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा 8 ऑक्‍टोबरपासून घेण्यात येणार आहेत. आतापर्यंत ऑफलाइन परीक्षा घेणाऱ्या 'आयडॉल'कडून पहिल्यांदाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहेत. आयडॉलमध्ये बीए, बी.कॉम, बीएस्सी आदी पदवी अभ्यासक्रमा सोबतच पदव्युत्तरच्या एम.कॉम, एम.एससी यासोबतच विविध प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम दुरस्थ शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून उपलब्ध केले जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या परीक्षा ऑनलाइन व बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पदवी स्तरावरील तृतीय वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी कम्प्युटर सायन्स, बीएससी आयटी तसेच सत्र 6 च्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 3 ऑक्टोबर पासून घेण्यात येणार आहेत. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व्दितीय वर्ष एम.ए, एम.ए. शिक्षणशास्त्र एम. कॉम, एम.एस्सी (गणित, आयटी,कम्प्युटर सायन्स) व एमसीए सत्र 6 च्या परीक्षा 8 ऑक्‍टोबरपासून घेण्यात येणार आहेत. प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष बीए ,बीकॉम,बीएस्सी कम्प्युटर सायन्स, बीएस्सी आयटी, एमसीए या अभ्यासक्रमाच्या पुनर्परीक्षार्थी, बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 25 सप्टेंबर पासून घेण्यात येणार आहेत. तर पदवी स्तरावरील प्रथम व द्वितीय वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी कम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमाच्या 2019-20 या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तसेच पदव्युत्तर प्रथम वर्ष शिक्षणशास्त्र, एम. कॉम, एमएससी (गणित, आयटी,कम्प्युटर सायन्स) अभ्यासक्रमांच्या 2019 विषय शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या पुनर्परीक्षार्थी, बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नोव्हेंबर 2020 मध्ये घेण्यात येणार आहेत.

आयडॉलकडून घेण्यात येणाऱ्या या परीक्षा 50 गुणांची असेल व त्याचा वेळ एक तासाचा असणार आहे. याचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यास दिलेल्या अध्ययन साहित्यावर आधारित असेल विद्यार्थ्यांसाठी एक नमुना प्रश्नपत्रिका देण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या अनुभवासाठी सराव परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details