महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CM Uddhav Thackeray : "वैचारिक प्रदूषण वाढलंय, राजकारण करा पण..."; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला - उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

आजकाल वैचारिक प्रदूषण वाढलयं. राजकारण करा पण त्यासाठी दर्जा असला पाहिजे. चांगले काम केले त्याचे कौतुक करणे ही दिलदारी विरोधी पक्षात नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला ( CM Uddhav Thackeray Slams Opposition ) आहे.

CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray

By

Published : May 7, 2022, 10:07 PM IST

मुंबई - आजकाल वैचारिक प्रदूषण वाढलयं. राजकारण करा पण त्यासाठी दर्जा असला पाहिजे. विरोध करणे म्हणजे विरोधी पक्ष नव्हे. चांगले काम केले त्याचे कौतुक करणे ही दिलदारी विरोधी पक्षात नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला ( CM Uddhav Thackeray Slams Opposition ) आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीमधील सर्व निवासी नागरिकांना ‘सर्वांसाठी पाणी’ हे नवे धोरण जाहीर केले आहे. या धोरणाचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ( 7 मे ) करण्यात आले. या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुंबई शहर पालक मंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

"कौतुकाची थाप मारणारे कमी" - बदलती मुंबई बघत आम्ही मोठे झालो. पाणी देण्याच्या कार्यक्रमात राजकारण आणायचे नाही. संत गाडगेबाबा बोलले होते तहानलेल्याला पाणी. ते काम आपण करत आहोत. पावसाळ्यात मुंबई तुंबते त्याच्यासाठी आम्ही काम करत आहोत. यंदा हिंदमाता तुंबणार नाही, यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहे. बाकी थाप मारणारे भरपूर, पण कौतुकाची थाप मारणारे कमी आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे.

"ती दिलदारी विरोधी पक्षात नाही" - सर्वांसाठी पाणी हे धोरण आज मंजूर केले जात आहे. सर्वांना पाणी देताना ते पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न आहे. जंगल कापून पाणी आणणे आपल्याला परवडणारे आहे का?, सध्या तापमान वाढले आहे. ग्लोबल वॉर्मिंग आहे. विकास करताना नागरिकांना त्रास होता कामा नये, या तत्वानुसार काम करत आहोत. थापेबाजी चालणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला आहे.

राज ठाकरेंना टोला - काम करू द्यायचे नाही. भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जातो, याची खंत व्यक्त करत राजकारण करा, पण त्यासाठी दर्जा असला पाहिजे. विरोध करणे म्हणजे विरोधी पक्ष नव्हे. चांगले काम केले त्याचे कौतुक करणे ही दिलदारी विरोधी पक्षात नाही. तसेच, येत्या १४ तारखेला मनातले बोलेन, असेही मुख्यमंत्री ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

कोणाला दिले जाणार पाणी -

  • खासगी जमिनीवरील अघोषित झोपडपट्टीधारकांना पाणीपुरवठा करणे.
  • तटीय नियमन क्षेत्रातील म्हणजेच सीआरझेड मधील झोपडीधारकांना सार्वजनिक नळ खांबावर पाणी पुरवठा करणे.
  • क्षमापित निवासी इमारतींमधील अनधिकृत वाढीव बांधकामांना नळजोडणी देणे.
  • प्रकल्पबाधित झोपडपट्टीधारकांना पाणीपुरवठा करणे.
  • निवासी इमारती किंवा त्यांच्या काही भाग द्यायचे नकाशा मंजूर नाही, त्यांना नळजोडणी देणे.
  • निवासी इमारती किंवा त्यांच्या काही भाग यांचे नकाशे मंजूर आहेत. परंतु, बांधकाम प्रारंभ पत्र शिवाय म्हणजे सीसी मिळालेली नाही. त्यांना नळजोडणी देणे.

ABOUT THE AUTHOR

...view details