महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 16, 2021, 8:53 PM IST

Updated : Aug 16, 2021, 10:12 PM IST

ETV Bharat / city

अल्पवयीन मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आता आहेत 'हे' नियम

राज्यातील १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखवणे बंधनकारक आहे. कोरोना निर्बंधासाठी असलेल्या ब्रेक'द'चेन अंतर्गत मार्गदर्शक सूचनांची नियमावली आरोग्य विभागाने आज जारी केली आहे.

राज्यातील १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी नवी नियमावली
राज्यातील १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी नवी नियमावली

मुंबई - राज्यातील १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोना निर्बंधासाठी असलेल्या ब्रेक'द'चेन अंतर्गत मार्गदर्शक सूचनांची नियमावली आरोग्य विभागाने आज जारी केली आहे.

काय आहेत सूचना?

राज्यात १८ वर्षाखालील मुला-मुलींचे लसीकरणाला अद्याप सुरूवात न झाल्याने १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेश देताना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा आणि महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखवणे आवश्यक करण्यात आले आहे. हे निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे. राज्यातील सर्व शॉपींग मॉल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये काम करणारे कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या असाव्यात. तसेच, लसीची दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झाल्याचे लसीकरण प्रमाणपत्र मॉलच्या प्रवेशद्वारावर दाखवण्याबाबत यापूर्वीच तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केलेले आहे.

Last Updated : Aug 16, 2021, 10:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details