मुंबई -काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स अर्थात सीआयएसई म्हणजे आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. दहावीची परीक्षा 5 मे ते 7 जूनदरम्यान होणार आहे. तर बारावीची परीक्षा 8 एप्रिल ते 16 जूनदरम्यान होणार आहे.
कोरोनासंदर्भात सूचना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर, आता दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्याची तयारी सर्वच बोर्डाने केली आहे. त्यानुसार आज आयसीएसई मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. परीक्षेचे वेळापत्रक आयसीएसईच्या www.cisce.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही परीक्षा घेताना कोरोनासंदर्भात केंद्रांनी दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना बोर्डाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत.