मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारयांच्या ( Silver Oak Attack Case ) निवासस्थानी 8 एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ला प्रकरणात 103 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात ( ST Worker Arrest For Silver Oak Case ) आली आहे. यानंतर मुंबई पोलिसांचे गुप्तचर यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचारी आंदोलन करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने पहिलेच संबंधित विभागाला दिली असल्याची बाब समोर आली आहे. संबंधित पोलीस स्टेशनकडून पोलीस बंदोबस्त लावण्यात उशीर झाला, त्यामुळे ही घटना घडली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
तीन महिने आधीच दिला होता इशारा -साधारण तीन महिनेआधीच राज्य गुप्तचर विभागाने एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा दिला होता. शरद पवारांच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची सूचना देखील दिली होती. दरम्यान या सर्व सुचना झोन II चे DCP योगेश कुमार यांना देण्यात आल्या होत्या. तरीही सिल्व्हर ओक निवासस्थानी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला नव्हता. या साऱ्या प्रकरणामध्ये मीडिया सिल्व्हर ओकवर पोहोचली. मात्र, पोलिसांना पोहोचायला उशीर का झाला, हा सवाल आता उपस्थित केला जातो आहे.
पोलिसांकडून निष्काळजीपणा -शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ल्या होणार ही माहिती मिळाल्यानंतर देखील पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आला नाही. त्यामुळे पोलिसांना अगोदर त्या ठिकाणी पत्रकार पोहोचले. मात्र पोलीस अधिकारी पोहोचले नसल्याने या कामांमध्ये निष्काळजी केल्याप्रकरणी अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, आता या प्रकरणाच्या चौकशीमध्ये एक नवी व धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्य गुप्तचर विभागाने अशी घटना घडू शकते, असा इशारा आधीच दिला होता, अशी माहिती समोर येते आहे.