मुंबई -महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली असून अॅड. गुणरत्न सदावर्तेही ( Adv gunratna sadavarte ) अयोध्येचा दौरा करणार ( gunratna sadavarte Going on Ayodhya Tour ) आहेत. आपण राम जन्मभूमीच्या केसमध्ये वकील होतो. त्यामुळे आपल्याला अयोध्येतून बोलावणे आले आहे, असे सांगत आपण लवकरच अयोध्येला जाणार ( gunratna sadavarte Going Ayodhya with family ) आहे. असे अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी जाहीर केले आहे.
बँकमधील सत्ताधारी पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली - गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, एसटी बँक कर्मचाऱ्यांच्या निवडणुकीमध्ये मी पॅनल उभा करणार असल्याने मला पुन्हा नोटीस पाठवण्यात आले आहे. बँकमधील सत्ताधारी पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने त्यांनी मला नोटीस पाठविली असल्याचे वक्तव्य प्रसारमाध्यमांशी बोलतांना सदावर्ते यांनी केले आहे.
चौकशीच्या नोटीसीला उत्तरासाठी वेळ मागितला - एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते अटक असताना त्यांच्याविरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यामुळे गावदेवी पोलीस सदावर्तेंची चौकशी करणार आहेत. पोलिसांनी सदावर्तेंना 110 अंतर्गत नोटीस पाठवली आहे. आज यासंदर्भात गुणरत्न सदावर्ते यांचे वकील गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नोटीसला उत्तर देण्याकरीता वेळ मागितला. त्यांना 10 जून पर्यंत वेळ देण्यात आला आहे, अशी माहिती सदावर्ते यांच्या वकिलांनी दिली.